Current Affairs | चालू घडामोडी | 01 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 01 JULY 2024

1) कृषी दिन = वसंतराव नाईक जयंती = 1 जुलै 1913

  • महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री
  • महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक
  • खासदार 1977 ते 80 (वाशिम)
  • वसंतराव नाईक समिती (पंचायत शासन) = 1 मे 1960
    => पंचायत राज व्यवस्थेची स्थापना

2) राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव: सुजाता सौनिक

  • महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला अधिकारी.
  • १९८७ बॅचच्या I.A.S.अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
  • या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
  • सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
  • पती आणि पत्नीने एक पद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

3) भारताच्या स्नेह रानाने इतिहास राचला.

  • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात दहा बळी घेणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू तर पहिली फिरकीपटू स्नेह राणा ठरली आहे .
  • याआधी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ने दहा बळी घेतले होते.

4) जनरल द्विवेदी ३०वे लष्करप्रमुख

  • जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी ३०वे लष्करप्रमुख म्हणून पदाची सूत्रे हाती घेतली. 
  • जनरल द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर कार्यरत असल्याचा दीर्घ अनुभव आहे.
  • चीनबरोबरच्या प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारतासमोर सुरक्षेची आव्हाने उभी असताना जरनल द्विवेदी लष्करप्रमुख झाले आहेत.

5) राष्ट्रीय डॉक्टर डे : 1 जुलै

  • 1 जुलै 1882 मध्ये भारताचे प्रसिद्ध फिजीशियन डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म झाला होता. तसेच त्यांचं निधन सुद्धा 1 जुलै 1962 रोजी झालं होतं.-
  • त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात भरपूर काम केलंय. त्यामुळे 1 जुलै हाच दिवस भारतात डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.
  • डॉक्टर डे २०२४ ची थीम : “Healing Hands, Caring Hearts”

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment