Current Affairs | चालू घडामोडी | 31 AUG 2024
अनुक्रमणिका
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान जनधन योजना सुरू केली.
- या योजनेला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
- जगभरातून या योजनेचा गौरव केला जातो.
- देशातील सर्व नागरिकांचे बैंक खाते असावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
- योजनेंतर्गत १० वर्षात ५३ कोटी खाती सुरू झालेली आहेत. या खात्यांत २.३ लाख कोटी रुपयांवर रक्कम जमा झालेली आहे.
- जनधन योजनेंतर्गत पुरुषांच्या खात्यपिक्षा महिलांचे प्रमाण अधिक असून, ३० कोटी खाती महिलांची आहेत.
- ३५ कोटी खाती ग्रामीण आणि निमशहरी भागांमधून उघडली गेली आहेत.
- ऑगस्ट २०२४ पर्यंत जनधन योजनेंतर्गत ३६.१३ कोटी रूपे डेबिट कार्ड जारी झालेले आहे. त्यापोटी कुठलाही खर्च खातेधारकांना करावा लागलेला नाही.
- या कार्डावर खातेधारकाला २ लाख रुपयांचा इन्श्युरन्स आणि १० हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सवलतही देण्यात येते.
2) पॅरालिम्पिक मध्ये एकाच दिवशी पदकांचा चौकार…
1) अवनी लेखरा – नेमबाजी – सुवर्ण पदक
2) मनीष नरवाल – नेमबाजी – रौप्य पदक
3) मोना अगरवाल – नेमबाजी – कांस्य पदक
4) प्रिती पाल – अथलेटिक्स – कांस्य पदक
3) रेल्वे बोर्डाच्या सीईओपदी प्रथमच दलित अधिकारी
- सतीशकुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती
4) स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष शेट्टी
- भारतीय स्टेट बँकेत विविध पदांवरील कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या श्रीनिवासुलू शेट्टी यांच्याकडे बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
- देशातील सर्वांत मोठी पतपुरवठादार बँक असलेल्या स्टेट उद्देश बँकेचे अध्यक्ष म्हणून शेट्टी यांनी मावळते अध्यक्ष दिनेश खारा यांच्याकडून बुधवारी कार्यभार स्वीकारला.
5) रतन टाटा यांना ‘अनुव्रत’ पुरस्कार प्रदान
6) वाढवण – भारताचे सर्वात खोलीचे बंदर
- वाढवण बंदरासाठी प्रस्तावित स्थान पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे आणि ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांच्यातील संयुक्त
उपक्रम म्हणून विकसित केले जाईल. - उद्दिष्ट एक अत्याधुनिक सागरी प्रवेशद्वार तयार करणे
- वाढवण प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये-
- भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर
- भारतातील १३ वे महत्त्वाचे बंदर
- प्रकल्प मूल्य रु. ७६२०० कोटी
- ऑल वेदर ग्रीनफील्ड पोर्टचा विकास
- एकूण क्षमता दरसाल साधारण ३०० दशलक्ष टन
7) केंद्र सरकारने उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी आणि सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी 29 ऑगस्ट रोजी उठवली असून, आगामी गळीत हंगामात इथेनॉल उत्पादनावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
- केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने सहा डिसेंबर २०२३ पासून इथेनॉल उत्पादनावर निर्बंध घातले होते
8) असना चक्रीवादळ
- अरबी समुद्रात साठ वर्षांनी ऑगस्टमध्ये चक्रीवादळ
- सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आधी एप्रिल-मे महिन्यात आणि पाऊस माघारी गेल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ चक्रीवादळे तयार होण्याचा मानला जातो.
- त्यामुळे सहसा पावसाळ्यात चक्रीवादळे तयार होत नाहीत. मात्र कच्छ, सौराष्ट्रवर असलेले दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे.
- ३० ऑगस्ट रोजी या दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
- 1891 पासूनच्या नोंदीनुसार अरबी समुद्रात ऑगस्टमध्ये चक्रीवादळ तयार होण्याची घटना 1964 मध्ये नोंदवली गेली होती. गेल्या 60 वर्षांत ऐन पावसाळ्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ झाल्याची नोंद नाही. त्यामुळे यंदाचे चक्रीवादळ हे 1891 पासून ऑगस्टमध्ये केवळ दुसरेच चक्रीवादळ असल्याची माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel