Current Affairs | चालू घडामोडी | 28 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 28 MAR 2024

1) 28 मार्च

1.1) 61 वी घटनादुरुस्ती, 1988

 • 1989 ला पारित
 • मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले

1.2) AICTE कायदा,1987

 • अंमल = 1988
 • अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेला वैधानिक दर्जा प्रदान
 • AICTE स्थापना = 1945

2) एका लघुग्रहाला भारतीय प्राध्यापक जयंत मूर्ती यांचे नाव देण्यात आले आहे

 • इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) ने भारतीय प्रोफेसर जयंत मूर्ती यांच्या नावावर लघुग्रहाचे नाव दिले आहे. याला पूर्वी 2005 EX29 असे म्हटले जात होते
 • मूळचे बंगलोरचे जयंत मूर्ती हे अंतराळ मोहिमा, अल्ट्राव्हायोलेट खगोलशास्त्र आणि आंतरतारकीय माध्यमातील कार्यासाठी ओळखले जातात.
 • 2021 मध्ये, प्रोफेसर मूर्ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (IIA) मधून निवृत्त झाले. तेव्हापासून ते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते जुलै 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत IIA चे कार्यवाहक संचालक होते.
 • प्रोफेसर मूर्ती नासाच्या न्यू होरायझन्स सायन्स टीममध्ये सामील होते
 • सूर्यमालेतील अतिनील किरणोत्सर्गाचा अभ्यास तसेच न्यू होरायझन्स मोहिमेमध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे

3) सदानंद दाते एनआयएचे (NIA) महासंचालक

 • ते राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते
 • विद्यमान महासंचालक दिनकर गुप्ता ३१ मार्च रोजी निवृत्त होणार असून त्यांच्या यांच्याजागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केली
 • भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) १९९० च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत
 • पुणे विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे.
 • दाते यांच्या संकल्पनेतून २०१२ मध्ये मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी कक्षाची (एटीसी) स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर दहशतवादाबाबत गुप्त माहिती गोळा करणारा कक्ष कार्यरत करण्यात आला.
 • मुंबईवर २६/११ ला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सदानंद दाते यांनी आपल्या जीवाची बाजी लावत शौर्यपूर्ण कामगिरी केली होती. या कामगिरीसाठी दाते यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.

4) राज्यातील नद्या केव्हा स्वच्छ होणार?

 • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे असल्याचे वास्तव आहे.
 • राज्यातील भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, पवना, इंद्रायणी, अंबा, अमरावती,भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गिरणा, कलू, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मूचकुंडी, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पूर्णा, सीना, सूर्या, तानसा, तापी, उल्हास, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वैनगंगा, वर्धा, वेणा इ. नद्या प्रदूषित
 • कारणे = वातावरणीय बदल, कमी पाऊस, मानवनिर्मित प्रदूषण, सांडपाणी, उद्याोगांमधील प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी, जलपर्णी
 • उपाय
 1. हरित लवादानुसार प्रदूषित नदी पट्ट्यांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र पर्यावरण संनियंत्रण दलाची स्थापना प्रदूषित पट्टे असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये करावी
 2. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात २५ टक्के रकमेची तरतूद सांडपाणी व नागरी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ठेवावी

5) थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता

 • हा कायदा लागू झाल्यास थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला आणि तैवान आणि नेपाळनंतर आशियातील तिसरा देश असेल.
 • जोडप्यांना विवाह पश्चात मिळणाऱ्या करबचतीची सुविधा, मालमत्तेचा वारसा हक्क, हॉस्पिटलमध्ये उपचार करताना जोडीदाराच्या उपचारासाठी द्यावी लागणारी परवानगी यासारखे अधिकार मिळणार आहेत.

6) अमेरिकेतील बाल्टिमोरच्या फ्रान्सिस स्कॉट की पुलाला मालवाहू जहाज धडकली

 • डाली या सिंगापूरच्या जहाजात विजेची समस्या आल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे
 • जहाजामध्ये २२ क्रू सदस्य भारतीय होते. दुर्घटनेपूर्वी दिलेल्या सूचनेमुळे अनेकांचे जीव वाचविण्यात यश आले. यामुळे सर्व भारतीयांचे कौतुक केले जात आहे
 • या भारतीयांनी प्रसंगावधान राखून पूल कोसळण्याआधी स्थानिक प्राधिकरणांना अलर्ट केल्याने अनेकांचे जीव वाचण्यास मदत झाली आहे.

7) जम्मू-काश्मीरमधून लष्कर, अफस्पा मागे घेण्याचा गृह मंत्रालयाचा विचार

 • जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर टप्प्या-टप्प्याने बराकीकडे परतेल, अशी रचना तयार केली आहे. पुढील सात वर्षांची योजना तयार आहे : गृहमंत्री अमित शहा

8) ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून (28 मार्च 2024)

 • स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसात व्यवहारपूर्तता शक्य
 • भांडवली बाजारात समभाग खरेदी-विक्रीची व्यवहारपूर्तता एका दिवसांत (सेटलमेंट) पूर्ण करणाऱ्या नव्या ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीची सुरूवात 28 मार्च पासून होत असून, यासाठी पात्र असलेल्या २५ कंपन्यांची यादी मुंबई शेअर बाजाराकडून जाहीर करण्यात आली.
 • ‘टी प्लस शून्य’ प्रणाली म्हणजे काय?
  • या नव्या प्रणालीमुळे समभाग खरेदी-विक्री प्रक्रियेत गतिमानता येण्यासह, असा व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याच दिवशी पैसेही मिळतील.

9) निवडणुकीचा इतिहास – 9

 • 1989 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला.
 1. काँग्रेस = 197
 2. जनता दल = 143
 3. भाजप 85
 4. CPM = 33
 • जनता दलाच्या व्ही.पी. सिंग यांनी भाजप व डाव्यांच्या पाठिंबावर नॅशनल फ्रंटचे सरकार स्थापन केले. त्यांनी या निवडणुकीत “राजा नाही फकीर है, देश की तकदीर है” अशी घोषणा दिली.
 • पुढे भाजपने 11 महिन्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडविण्याचा मुद्दा करून जनता दलाचे सरकार खाली खेचले
 • व्ही पी सिंग हे अगोदर इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या जवळचे नेते होते. परंतु बोफोर्सच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व देशात भ्रष्टाचार विरोधी अभियान विरोधी पक्षांच्या सहकार्याने सुरू केले.
 • पंतप्रधानपदी असताना मंडल आयोगाच्या शिफारशींचा स्वीकार हा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला

10) लोकसभेतील महिलांच्या आत्तापर्यंतचे प्रतिनिधित्व

वर्ष आणि महिला खासदारांची संख्या

 1. 1952 = 24
 2. 1957 = 22
 3. 1984 – 85 = 43
 4. 2004 = 45
 5. 2009 = 59
 6. 2014 = 62
 7. 2019 = 78 (सर्वाधिक)(14.4%)

11) आयपीएल मध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम

 • सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध विक्रमी 277 धावा रचल्या
 • रोहित शर्मा मुंबई इंडियन्स कडून 200 सामने खेळलेला पहिला खेळाडू.
 • एका संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
 1. विराट कोहली = 239
 2. महेंद्रसिंग धोनी = 222
 3. रोहित शर्मा = 200

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment