Current Affairs | चालू घडामोडी | 29 MAR 2024
1) क्रिप्स योजना जाहीर = 29 मार्च 1942
- मुद्दे =>
- संघराज्यातील त्वरित निर्मिती व वसाहतींना राज्य
2) अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये AFSPA चा कालावधी वाढवला
- गृह मंत्रालयाने (MHA) अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील काही जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (AFSPA) 1 एप्रिल 2024 पासून अतिरिक्त सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
- AFSPA = Armed Forces Special Right Act, 1958
- सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, 1958 , “अडथळा” समजल्या जाणाऱ्या भागात सुरक्षा दलांना व्यापक अधिकार प्रदान करतो. AFSPA अंतर्गत, सशस्त्र दलाच्या जवानांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक वाटल्यास शोध, अटक आणि गोळीबार करण्याचा अधिकार आहे.
3) आता पीएच. डी. करण्यासाठी नेट अनिवार्य
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पीएचडी प्रवेश राष्ट्रीय पातळीवरून परीक्षा घेऊन करण्याची शिफारस होती, त्यानुसार आता नेट च्या गुणांवर प्रवेश होतील, यामध्ये 70 टक्के नेट गुण व 30 टक्के मुलाखत या आधारे आता पीएच.डी प्रवेश होईल
- यामुळे पेट परीक्षा आता कालबाह्य होणार आहे
4) 2024 लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 7 कोटींनी वाढली
- 2019 = 89.6 कोटी
- 2024 = 96.8 कोटी
5) स्वीप योजना
- SVEEP = Systematically Voter’s Education and Electoral Participation
- मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने या अभियानाची संकल्पना मांडलेली आहे
- यामध्ये मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी मतदार यादीतील तपशील दुरुस्त करणे व स्थलांतरित आणि मृत कुटुंबातील सदस्यांचे नाव हटविण्यासंबंधीच्या प्रक्रियेबाबत मतदारांना शिक्षित करण्यासाठीचे उपक्रम राबविले जातात
6) ‘मनरेगा’च्या मजुरीत ४ ते १० टक्क्यांची वाढ
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) दैनंदिन मजुरीच्या दरांत चार ते दहा टक्क्यांची वाढ केली आहे.
- महाराष्ट्रातील मजुरीच्या दरात आठ टक्क्यांची वाढ झाली असून येथे प्रतिदिन २९७ रुपये मजुरी दिली जाणार आहे. १ एप्रिल 2024 पासून हे दर अमलात येतील
- महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मजुरी
- सर्वात जास्त :- हरयाणा – 374₹
- सर्वात कमी :- बिहार – 228₹
7) राज्यातील शाळांचेही आता मूल्यांकन
- ‘शालेय शिक्षण’कडून राज्य शाळा मानक प्राधिकरणाची स्थापना
- उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर मूल्यांकन होईल. त्यात शाळांना क ते अ श्रेणी दिली जाणार आहे.
8) निवडणुकीचा इतिहास – 10
- 1996 ला भारतीय जनता पक्षाने “सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटल बिहारी” लोकप्रिय घोषणा दिली
- भाजपच्या जागा
- 1991 = 120
- 1996 = 161
- 1996 साली कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली.
- भाजपचे अटलबिहारी हे पहिल्यांदा पंतप्रधान बनले. मात्र त्यांचे सरकार केव्हा तेरा दिवस टिकले.
- त्यानंतर पुन्हा राष्ट्रीय आघाडीचे सरकार सत्तेवर आले
9) भाजपा आणि काँग्रेस यांनी आतापर्यंत जिंकलेल्या जागा
- वर्ष भाजपा काँग्रेस
- 1952 – 364
- 1984-85 2 414
- 1989 85 197
- 2014 282 44
- 2019 303 52
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel