Current Affairs | चालू घडामोडी | 27 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 27 MAR 2024

1) A-SAT ची चाचणी = 27 मार्च 2019

 • उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
 • अभियानाचे नाव = मिशन शक्ती

2) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे आयोजित मानवी हक्क विषयावर आयोजित लघुपटांच्या सात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 • मराठी दिग्दर्शक भूषण अरुण मेहरे यांच्या एलजीबीटीक्यु लोकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘किरण-ए रे ऑफ होप’ या लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
 • द्वितीय पारितोषिक बिभुज्जल राज कश्यप यांना त्यांच्या आसामी भाषेतील ‘मुखाग्नी- द स्मशान’ या लघुपटाला देण्यात आला.
 • नितीन सोनकर यांना त्यांच्या हिंदी भाषेतील ‘राईट टू फ्रीडम’ या चित्रपटासाठी तृतीय पारितोषिक मिळाले.
 • प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दीड लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख रुपये आहे.
 • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली.
 • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष = न्यायमूर्ती अरुण मिश्रा

3) मार्टी स्थापन करण्याचे नियोजन आचारसंहिता संपल्यानंतर

 • बार्टी, सारथी व महाज्योतीच्या धर्तीवर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) ची स्थापना
 • इतर महत्वाच्या संस्था
  • आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (मातंग समाजासाठीची संस्था)
  • बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
  • सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था
  • महाज्योती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
  • अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी
  • वनार्टी : बंजारा समाजासाठीची संस्था (सध्या फक्त घोषणा)

4) सखी ॲप: गगनयान क्रू साठी लाइफ लाइन.

 • विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) यांनी हे ॲप विकसित केले आहे
 • SAKHI = Space-borne Assistant and Knowledge Hub for Crew Interaction
 • हे एक बहुउद्देशीय ॲप आहे जे गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेतील अंतराळवीरांना महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती शोधणे किंवा एकमेकांशी संवाद साधणे यासारखी अनेक कार्ये पार पाडण्यास मदत करेल.

5) महारत्न दर्जा कंपनी

 • धोरण = डिसेंबर 2010 मध्ये सुरुवात
 • निकष एखाद्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र कंपनीला पुढील तीन निकष पूर्ण करावे लागतात.

गेल्या तीन वर्षांमध्ये

 1. 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक निव्वळ नफा
 2. पंधरा हजार कोटी रुपये इतके सरासरी निव्वळ मूल्य (Net Worth)
 3. 25000 कोटी रुपयांपेक्षा अधिक सरासरी उलाढाल (Turn-Over)
 • सध्या 13 महारत्न कंपनी आहेत
 • 13 वी = ऑईल इंडिया लिमिटेड (OIL)

6) आशियातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईतच!

 • बीजिंगला मागे टाकत पहिले स्थान
 • ‘हुरून ग्लोबल’ने जाहीर केलेल्या अतिश्रीमंतांच्या यादीनुसार, आशिया खंडात सर्वाधिक ९२ अब्जाधीश मुंबईतील असून, बीजिंगमधील अब्जाधीशांची संख्या ९१ आहे.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जागतिक पातळीवर अंबानी हे दहाव्या स्थानी आहेत.
 • अदानी समूहाचे गौतम अदानी हे देशातील श्रीमंतांमध्ये दुसऱ्या स्थानी तर जागतिक पातळीवर 15 व्या स्थानी
 • जगात सर्वांत श्रीमंत एलॉन मस्क आहेत.

7) ऑपरेशन संकल्प : भारतीय नौदलाचे सागरी सुरक्षा ऑपरेशन

 • या ऑपरेशन ची सुरुवात = 2019
 • सध्या 23 डिसेंबरच्या मध्यापासून सुरू
 • पर्शिया चे आखात आणि एडन चे आ या ठिकाणी हा सराव सुरू आहे
 • सागरी क्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेल्या इस्रायल – हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर याचे महत्व वाढले आहे

8) महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख सदानंद दाते यांची NIA च्या महासंचालक पदी निवड

 • NIA= National Investigation Agency

9) शाहू, आंबेडकर आणि ठाकरे

 • बाबासाहेबांचा टाइम्स ऑफ इंडिया मधील एक लेख वाचून राजश्री शाहू महाराज प्रभावित झाले होते. आपले विश्वासू ‘दत्तोबा पवार’ यांच्याकडून त्यांनी बाबासाहेबांची माहिती मिळवली
 • शाहूंच्या मदतीतूनच ‘मूकनायक’ हे बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र प्रकाशित होऊ लागले
 • कोल्हापुरातील माणगाव येथे 20 आणि 21 मार्च 1920 रोजी परिषद झाली. त्याचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषविले.
 • माणगाव परिषदेनंतरच झालेल्या नागपूर येथील अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांना भूषविले
 • शाहू महाराज प्रबोधनकारांना ‘कोदंड’ असे म्हणत

10) निवडणुकीचा इतिहास – 8

 • इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्याच अंगरक्षककरवी हत्या झाली.
 • त्यांच्या हत्यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले
 • त्यानंतर दोनच महिन्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ‘राजीव गांधी आयेंगे, नयी रोशनी लायेंगे’ अशी घोषणा दिली होती
 • काँग्रेसने 1984 च्या निवडणुकीत 524 पैकी तब्बल 415 जागांवर विजय मिळवला
 • याच निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले. त्यातील 50 टक्के मतदान एकट्या काँग्रेस पक्षाला झाले होते.
 • दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशातील तेलगू देशम पक्ष होता. त्याला केवळ 30 जागा मिळाल्या होत्या

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment