Current Affairs | चालू घडामोडी | 30 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 30 AUG 2024

अनुक्रमणिका

1) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

  • साक्री महानिर्मितीचे सोलार हब होणार

2) खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघ पाच पदकांचा मानकरी

  • भारतीय संघाने एक सुवर्ण आणि चार रौप्य अशी एकूण पाच पदके पटकाविली. पदकतालिकेत भारतीय संघ आठव्या स्थानी राहिला. विजेत्या चमूमध्ये पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
  • ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथे 17 ते 26 ऑगस्ट 2024 दरम्यान ही स्पर्धा झाली
  • यंदा इराणने सर्वाधिक पाच सुवर्णपदके मिळवली
  • पुढील वर्षी ऑगस्टमध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात येणार आहे.
  • त्यामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. अर्णब भट्टाचार्य यांनी आयोजनासाठीचा ध्वज स्वीकारला.

3) औद्याोगिक स्मार्ट शहरांमध्ये राज्यातील दिघीचा समावेश. केंद्राकडून याबद्दलची घोषणा

  • देशातील 10 राज्यांमध्ये 12 औद्याोगिक स्मार्ट शहरे उभी केली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिघीचाही समावेश आहे
  • मुंबई-दिल्ली, अमृतसर – कोलकाता, विशाखापट्टणम – चेन्नई, हैदराबाद – बेंगळूरु, हैदराबाद – नागपूर आणि चेन्नई – बेंगळूरु असे सहा औद्याोगिक कॉरिडोर विकसित केले जात आहे. या कॉरिडोरमध्ये ही 12 औद्याोगिक स्मार्ट शहरे उभी केली जातील.

4) कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या व्याप्तीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

  • कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या (एआयएफ) व्याप्तीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
    • सरकारने या योजनेची व्याप्ती १ लाख कोटी रुपयांनी वाढविली आहे. देशातील शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा मजबूत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • सरकारने या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सामुदायिक शेती मालमत्ता निर्माण करण्यासाठी व्यवहार्य प्रकल्पअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यास परवानगी दिली आहे.
    • 2020 मध्ये पंतप्रधानांनी ही योजना सुरू केल्यापासून ६,६२३ गोदामे, ६८८ शीतगृहे आणि २१ सायलो प्रकल्पांच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, परिणामी देशात सुमारे ५०० लाख टन अतिरिक्त साठवण क्षमता निर्माण झाली आहे.

5) 234 नव्या शहरांसाठी खासगी एफएम रेडिओ

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने खासगी एफएम रेडिओ टप्पा-३ धोरणांतर्गत २३४ नवीन शहरांमध्ये ७३० चढत्या ई-लिलावाच्या तिसऱ्या तुकडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
  • अंदाजे राखीव किंमत ७८४.८७ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
  • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येथे सांगितले की, मंत्रिमंडळाने एफएम वाहिनीचे वार्षिक परवाना शुल्क जीएसटी वगळून एकूण महसुलाच्या चार टक्के आकारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे.

6) चंद्रावरील मातीतून काढले पाणी

  • चंद्रावरून आणलेल्या मातीतून पाण्याचा अंश वेगळा काढण्याचे आगळे तंत्र चिनी शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
  • २०२० साली पार पडलेल्या चांग ई-५ या मोहिमेद्वारे चंद्रावरील माती, दगड यांचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणण्यात आले होते.

7) राज्यसभेतही पहिल्यांदाच ‘रालोआ’ला पूर्ण बहुमत. पोटनिवडणुकीत ११ उमेदवार बिनविरोध

  • राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत १२ पैकी ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून भाजपला ८ तर, ‘रालोआ’तील दोन घटक पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. काँग्रेसलाही एक जागा जिंकता आली
  • या निकालामुळे भाजपचे संख्याबळ ९५ तर, ‘रालोआ’चे संख्याबळ ११२ झाले आहे.
  • राज्यसभेच्या २४५ जागांपैकी जम्मू-काश्मीरमधील व नियुक्त प्रत्येकी चार अशा ८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तरी वरिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्या २३७ असून बहुमतासाठी ११९ इतक्या संख्याबळाची गरज आहे.
  • ‘रालोआ’ला सहा नियुक्त सदस्य व एका अपक्षाचा पाठिंबा असल्याने ‘एनडीए’चे एकूण संख्याबळ ११९ झाले असून त्रिपुराची जागा जिंकल्यानंतर हे संख्याबळ १२० होईल. त्यामुळे राज्यसभेत ‘रालोआ’ला पूर्ण बहुमत मिळाले आहे.

8) पॅरिस पॅराऑलिंपिक मध्ये भारताची पदकांची सुरुवातच सुवर्ण पदकाने.

  • नेमबाजीतील १० मी एअर रायफल SH1 मध्ये अवनी लेखराने भारताला ही स्वप्नवत सुवर्ण सुरुवात करून दिली.
    • भारताच्याच मोना अगरवालने कांस्यपदक पटकावले.
  • अवनीने सुवर्ण जिंकताना पॅराऑलिंपिक विक्रम (२४९.७) आपल्या नावे केला.
  • अवनी लेखरा हिने टोकियो ऑलिंपिक मध्ये देखील सुवर्ण जिंकले होते. यांसह ती पॅराऑलिंपिक मध्ये २ सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

9) प्रितीने जिंकले कांस्यपदक !

  • प्रीती पाल पॅरालिम्पिक गेम्स मधील ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.
  • तिने महिलांच्या १०० मी T ३५ प्रकारात १४.३१ सेकंद अशी आपली सर्वोत्तम वेळ देत हे यश प्राप्त केले.
  • भारतीय खेळाडूने तेही ऑलिंपिक सारख्या मोठ्या स्पर्धेत आणि ते देखील १०० मी धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकणे हा एक स्वप्नवत क्षण आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment