Current Affairs | चालू घडामोडी | 14 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 14 OCT 2023

1) पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत ‘फळपीक विमा’.

  • पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक विमा राबवण्यात येते.
  • मृग व आंबिया (ऑक्टोबर – जुलै ) बहरातील विविध फळपिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे या साठीची ही योजना.

2) पुनर्विचार याचिका व क्युरेटीव्ह याचिका.

  • मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली.
  • पुनर्विचार / फेरविचार (रिव्यू) याचिका.
    • उच्च व सर्वोच्च न्यायालयात ‘अनुच्छेद 137’ नुसार निर्णयाचा पुनर्विचार किंवा फेरविचार करण्याचा अधिकार आहे.
    • निर्णयात काही गंभीर / तांत्रिक त्रुटीमूळे याचिका कर्त्यांवर अन्याय झाल्याचे दिसून आल्यास पुनर्विचार याचिका दाखल करता येते.
    • सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका जर फेटाळली तर न्याय मिळण्याची शेवटची संधी म्हणून ‘क्युरेटीव्ह याचिका’ सादर करण्याची तरतूद आहे.
    • ही तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद 142 नुसार आहे.
    • सर्वोच्च न्यायालयाने रूपा अशोक हुरा विरुध्द रूपा हुरा प्रकरणात 2002 मध्ये निर्णय देताना अनुच्छेद 142 नुसारच्या अधिकारांचा वापर करत क्युरेटीव्ह याचिकेचा अखेरचा पर्याय उपलब्ध करून दिला.
    • पुनर्विचार याचिका निर्णयानंतर 30 दिवसात बंधनकारक तर क्युरेटीव्ह याचिका पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर सुयोग्य वेळेत दाखल करता येते.
  • मराठा आरक्षण संदर्भातील घडामोडी.
    • राज्य सरकारने 2018 मध्ये कायदा करून स्वतंत्र संवर्ग तयार करून ‘न्या. गायकवाड आयोगाच्या’ शिफारशींनुसार मराठा समाज मागासलेला असल्याने आरक्षण दिले होते.
    • सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अशोक भूषण यांच्या 5 सदस्यीय पीठाने समितीचे निष्कर्ष फेटाळले व मराठा समाज मागास नसल्याचे मत नोंदवले.
    • त्यानंतर यावरील फेरयाचिका देखील घटनापीठाने फेटाळून लावली.
    • सध्या राज्य सरकारने क्युरेटीव्ह याचिका दाखल केलेली आहे.

3) क्रिकेटचा ऑलिंपिक 2028 मध्ये समवेशाची शक्यता.

  • 2028 लॉस एंजलिस (USA) ऑलिंपिक.
  • 5 नवीन खेळ समवेशाची शक्यता = बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्कॅश, लॅक्रॉस व T-20 क्रिकेट.
  • क्रिकेटचा 2028 मध्ये समावेश झाल्यास 128 वर्षानी क्रिकेट ऑलिंपिकमध्ये येईल. यापूर्वी 1900 मध्ये क्रिकेट ऑलिंपिकचा भाग होता.

4) सत्यजित रे पुरस्कार ‘मायकल डगल्स’ यांना जाहीर.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment