Current Affairs | चालू घडामोडी | 15 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 15 OCT 2023

1) वाचन प्रेरणा दिन – 15 ऑक्टोबर

  • माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होतो.

2) भारत 2036 च्या ऑलिंपिक यजमानपदासाठी उत्सुक – पंतप्रधान मोदी.

  • 2036 च्या ऑलिंपिक यजमानपदेबाबत 2029 च्या युथ ऑलिंपिकसाठी भारत सज्ज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
  • आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 च्या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबईत करण्यात आले. या वेळी ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष ‘थॉमस बाक’ देखील उपस्थित होते.

3) भारत – श्रीलंका फेरिसेवा 4 दशकांनी सुरू.

  • तमिळनाडूच्या ‘नागपट्टीनम’ किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या उत्तरेकडील ‘कांकेसंतुराई’ दरम्यान ही सेवा असणार आहे.
  • ‘चेरियपानी’ ही ‘हाय स्पीड क्राफ्ट’ (बोट) ही सेवा देणार आहे.

4) विद्यार्थ्यांसाठी ‘अपार’ क्रमांक.

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी’ च्या धर्तीवर विद्यार्थ्यांचे “ऑटोमाटेड परमनंट अकॅडेमीक रजिस्ट्री’ (अपार) काढण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामुळे विद्यार्थ्याना एक विशेष क्रमांक मिळणार असून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजीटली साठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे ‘मोनेटरिंग’ करता येणार आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment