Current Affairs | चालू घडामोडी | 30 APR 2024
1) 30 एप्रिल
1.1) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती
1.2) किंग्सफोर्ड वर हल्ला (मुजफ्फरपुर) = 30 एप्रिल 1908
- सहभागी व्यक्ती = खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी
1.3) सेवाग्राम (वर्धा) आश्रमाची स्थापना = 30 एप्रिल 1936
- सविनय कायदेभंगानंतर गांधीजींचे वास्तव्य
2) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती
(राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे)
- लोकपाल
1st – न्या. पिनाकी चंद्र घोष
2nd – न्या. ए. एम. खानविलकर
- वैधानिक संस्था (Statutory Body)
- लोकपाल ही संकल्पना – स्वीडन 1st देश 1809
- फिनलॅड -1919
- डेन्मार्क -1955
- नॉर्वे – 1962
- न्यूझीलंड -1962- (1st Commonwealth Country)
- ब्रिटन-1967
- भारतात माजी कायदा मंत्री अशोक कुमार सेन हे 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला संसदेत घटनात्मक लोकपालची संकल्पना मांडणारे पहिले भारतीय ठरले .
- डॉ. एल.एम. सिंघवी यांनी 1963 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त हे शब्द प्रथम वापरले.
- संसदेत 1st लोकपाल विधेयक -1968 (शांती भूषण यांनी)
- अण्णा हजारे उपोषण -15 एप्रिल 2011
- लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013
- राष्ट्रपतींकडून संमती – 1 जानेवारी 2014
- लागू – 16 जानेवारी 2014
- लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) कायदा 2016
- लोकपाल ही बहु-सदस्यीय संस्था आहे, ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात.
(निम्मे न्यायिक सदस्य असतील आणि किमान 50% सदस्य SC/ST/OBC/अल्पसंख्याक आणि महिला असतील.) - अध्यक्ष/सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवसी कमीत कमी वय – 45 वर्षे असले पाहिजे.
- अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतो.
- लोकपालच्या अधिकारक्षेत्रात पंतप्रधान, मंत्री, संसद सदस्य, गट A, B, C आणि D अधिकारी आणि केंद्र सरकारचे अधिकारी यांचा समावेश होतो.
- लोकपालच्या चौकशी शाखेला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत.
- लोकपाल ही बहु-सदस्यीय संस्था आहे, ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात.
- लोकायुक्त (राज्य पातळीवर केंद्राच्या लोकपाल प्रमाणे संस्था)
- 1st लोकायुक्त कायदा – ओडिसा -1970
- 1st लोकायुक्त संस्था स्थापन – महाराष्ट्र – 1971
- सर्वात Strong लोकायुक्त संस्था – कर्नाटक
- सुधारित लोकायुक्त कायदा = 15 डिसेंबर 2023
- सुधारित लोकायुक्त कायद्यात मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, भारतीय प्रशासन, पोलीस, वन सेवेतील अधिकारी, राज्य सरकारी कर्मचारी, स्थानिक प्राधिकरणांचे सदस्य, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळ, प्राधिकरण आदी सर्वांनाच या कायद्याच्या कक्षेत
- मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्यास कोणतीही चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या दोनतृतीयांश सदस्यांची पूर्वमान्यता लागेल.
3) ISRO घेणार हेलिकॉप्टरमधून मॉड्यूल गगनयान पॅराशूटची चाचणी
- यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट (IADT) मध्ये एक चिनूक हेलिकॉप्टर क्रू मॉड्यूलला सुमारे 4-5 किमी उंचीवरून सोडले जाईल
- ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या संकटकालीन परिस्थितीत पॅराशूट प्रणालीची चाचणी करणारी IADT च्या मालिकेतील ही पहिलीच चाचणी असेल
4) 14 वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीला 30 व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी देणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला.
- या मुलीच्या पालकांनी याबाबत केलेल्या विनंतीनंतर ‘पीडित मुलगी सुखरूप राहणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे’ असे न्यायालयाने नमूद केले.
- काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने 30 व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी दिली होती
5) ‘ईएसजी’ मानांकनासाठी इक्राच्या उपकंपनीला सेबीची मंजुरी
- आघाडीची पतमानांकन संस्था ‘इक्रा’ची उपकंपनी प्रगती डेव्हलपमेंट कन्सल्टिंग सर्व्हिसेस लिमिटेडला (पीडीसीएसएल) कंपन्यांना पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सु-प्रशासन अर्थात ‘ईएसजी’ केंद्रित मानांकन बहाल करण्यास भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने परवानगी दिली.
- ईएसजी काय आहे?
- Environmental, social and governance = ESG
- ईएसजी म्हणजे कंपन्यांकडून जपली जाणारी पर्यावरणविषयक संवेदनशीलता, सामाजिक भान आणि उत्तम प्रशासनाच्या तत्त्वांना दिला जाणारा प्राधान्यक्रमाचा निकष आहे.
- या जबाबदारीच्या निकषावर आणि मानकांवर कंपन्या कसे गुण मिळवतात त्यानुसार त्यांची संभाव्य गुंतवणुकीसाठी निवडीचा नवप्रघात जागतिक स्तरावर लोकप्रिय असून, तो भारतातही आता रूजू पाहत आहे.
6) दुबईत साकारणार जगातील सर्वात मोठे विमानतळ
7) ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर
- गायक = संजू राठोड
- ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान या गाण्याने मिळावला आहे
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel