Current Affairs | चालू घडामोडी | 02 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 2 सप्टेंबर दिनविशेष
- 2 सप्टेंबर 1946 = हंगामी सरकारची स्थापना
- जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली
2) Paralympic 2024:-
- निशादने जिंकले रौप्य :
- निशादने पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदक जिंकले.
- प्रीती पाल ने जिंकले कांस्य :
- महिलांच्या २०० मीटर T35 प्रकारात तिने ३०.१ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत कांस्य पदक जिंकले.
3) पॅरिस पॅराऑलिंपिक मध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले नितेश कुमारने
- बॅडमिंटन SL3 प्रकारात नितेशने संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या बेथेलला २१-१४,१८-२१,२३-२१ असे हरवून सुवर्ण यश प्राप्त केले.
- हे भारताचे ह्या स्पर्धेतील एकूण नववे पदक आहे.
4) भारताच्या योगेश कथुनियाचा बेस्ट थ्रो अन् पटकावलं सलग दुसरं पॅरालिम्पिक रौप्यपदक
- भारताच्या योगेश कथुनिया याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये डिस्कस थ्रो या खेळात रौप्य पदक पटकावले आहे.
- योगेशने त्याच्या हंगामातील सर्वोत्तम ४२.२२ मीटर थ्रोसह रौप्यपदक जिंकले.
- योगेशने भारताकडून दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि पुन्हा एकदा यशाची पुनरावृत्ती केली. योगेशने टोकियो पॅरालिम्पिक गेम्स २०२१ मध्येही भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.
5) सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन ध्वजावर ‘यतो धर्मस्ततो जयः’ असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे, ज्याचा अर्थ ‘जेथे धर्म आहे, तेथे विजय होईल.’
- ध्वजाच्या शीर्षस्थानी अशोक चक्र, मध्यभागी सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि तळाशी राज्यघटनेचे पुस्तक आहे.
6) खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना
- कृती आराखडा कसा?
- पहिला टप्पा : जिल्हास्तरीय खटले व्यवस्थापन समित्या
- दुसरा टप्पा : १० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या खटल्यांचे निराकरण
- तिसरा टप्पा : जून २०२५ पर्यंत प्रकरणांचा अनुशेष दूर करणार
- देशभरातील विविध न्यायालयांत शेकडो खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांचा निपटरा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे.
- कृती आराखड्याच्या तीन टप्प्यांमध्ये जिल्हास्तरीय खटले व्यवस्थापन समित्या तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली.
7) ड्युरंड चषक 2024
- विजेता संघ = नॉर्थ ईस्ट युनायटेड (60 लाख), पहिल्यांदाच विजेता संघ
- उपविजेता संघ = मोहन बागान (30 लाख)
- गोल्डन बुट नोहा सदाउई (3 लाख)
- गोल्डन बॉल जितीन एमएस (5 लाख)
- सामनावीर – गुरमीत सिंग
- अंतिम सामना ठिकाण = सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता
- स्पर्धा कालावधी = 27 जुलै ते 31 ऑगस्ट 2024
- एकूण सहभागी संघ 24
- ड्युरंड कप स्पर्धाविषयी :
- आशियातील सर्वांत जुनी फुटबॉल स्पर्धा
- सुरुवात 1888
- जनक हेड़ी मॉर्टिमर ड्युरंड
- आयोजन = भारतीय लष्कर
- दरवर्षी ही स्पर्धा होती
- सर्वाधिक वेळा विजेता संघ मोहन बागान (17 वेळा)
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी प्रायोजकत्व संबंधामुळे इंडियन ऑइल ड्युरंड स्पर्धा देखील बोलले जाते
- जॉन अब्राहम हा नॉर्थ ईस्ट युनायटेड या विजेत्या संघाचा मालक आहे
8) तुलसीमती
- पॅरा बॅडमिंटन – महिला एकेरी SU5 🥈 सिल्व्हर
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel