Current Affairs | चालू घडामोडी | 13 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 FEB 2024

1) सरोजिनी नायडूंचा जन्मदिन = 13 फेब्रुवारी 1879

 • भारताच्या गानकोकिळा अशी उपाधी
 • राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष = कानपूर अधिवेशन (1925)

2) उत्तर प्रदेशातील मोगल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

3) पंजाब, दिल्लीकरांच्या ताटात मराठवाड्याचा राजमा!

 • धाराशिवमधील वाशी, कळंब व बीडमधील केज या तीन लगतच्या तालुक्यांत १० हजार हेक्टरांवर राजमाची पेरणी करण्यात आली आहे.
 • हरभऱ्याला पर्याय म्हणून कृषी विभाग राजम्याची लागवड करण्याविषयी शेतकऱ्यांना सूचवत आहे. ९० दिवसांत येणारे हे पीक आहे. दोन ते तीन पाणीपाळ्यातही पीक चांगल्या प्रकारे येते.
 • महाराष्ट्रातील अनेक शेतकरी राजम्याला घेवडा म्हणतात. परंतु घेवडा वेलीवर येणारे द्विदल धान्यवर्गीय असून राजम्याचे सोयाबीनसारखे झाड असते.
 • भारतात साधारणपणे दक्षिण आफ्रिका, ब्रह्मदेश, ब्राझिल आदी देशांमधून माल येतो. आफ्रिकेतून येणारा काळपट, कॉफी रंगातील राजम्याला काश्मिरी राजमा म्हणतात. पांढऱ्या रंगाच्या राजम्याला चित्रा म्हणतात.
 • दिल्ली, पंजाबसह उत्तर भारतामध्ये ‘राजमा-चावल’ प्रसिद्ध आहे. कमी पाण्यावर आणि कमी कालावधीत येणारे हे पीक मराठवाड्यासाठी लाभदायी ठरत आहे. येथून दररोज सुमारे १०० टन राजमा दिल्लीत पाठविला जाऊ लागला आहे.

4) अशोक चव्हाण यांचा 12 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा

 • मुख्यमंत्री कार्यकाळ
  2008 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
  2009 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

5) UPI ची श्रीलंका आणि मॉरिशस मधे सुरुवात.

 • UPI लागू केलेले 7 देश
  1. सिंगापूर
  2. भूतान
  3. नेपाळ
  4. श्रीलंका
  5. मॉरिशस
  6. UAE
  7. फ्रान्स

6) कतारमधून भारतीय माजी नौसैनिकांची सुटका

 • कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय माजी नौसैनिकांची सुटका झाली.
 • आठपैकी सात जण मायदेशी परतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले.
 • याबद्दल परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी अमिर तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत.

7) निधीसाठी नवे निकष प्रस्तावित : महाविद्यालयांसाठी ‘यूजीसी’कडून नव्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध

 • महत्वाचे निकष
  1. केंद्र सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी नॅक, नॅब मूल्यांकनात सहभागी होणे,
  2. ‘एनआयआरएफ’ क्रमवारी,
  3. प्राध्यापकांची किमान ७५ टक्के पदे भरलेली असणे आवश्यक
  4. त्याशिवाय शिक्षकांना केंद्र, ‘यूजीसी’ किंवा राज्य सरकारच्या धोरणानुसार वेतन देणेही बंधनकारक आहे.
  5. मिळालेल्या निधीचा पूर्ण वापर न झाल्यास तो परत करण्याचे प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार
 • विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

8) SWATI पोर्टल

 • ‘SWATI’ = Science for Women-A Technology & Innovation
 • STEMM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि औषध) मध्ये भारतीय महिला आणि मुलींना मदतीसाठी या पोर्टल ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

9) मॉरिशस मध्ये UPI सोबतच रूपे कार्डची देखील सुरुवात.

 • रूपे कार्ड वापरणारे 5 देश
  1. नेपाळ
  2. भूतान
  3. सिंगापूर
  4. UAE
  5. मॉरिशस

10) अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या प्रत्येकाच्या घरावरील सोलार च्या योजनेचे नाव ‘पी एम सूर्यघर : मुफ्त बिजली योजना’ असे करण्यात आले आहे.

11) केंद्र सरकारचा मोठा निर्णय : बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

 • 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावनी करण्यात येणार आहे.
 • याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होतं.
 • सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यही आपल्या व्यवस्थेत सामील करतील.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment