Current Affairs | चालू घडामोडी | 25 MAY 2024
1.1) रासबिहारी बोस जयंती = 25 मे 1886
- क्लार्क = वन अनुसंधान संस्था, डेहराडून
- लॉर्ड हार्डिंग वर बॉम्ब हल्ला = 1912
- इंडियन इंडिपेंडन्स लीग = 1942
- गदर चळवळ नेते = 1915
2) दूरदर्शन वाहिनीने काळाबरोबर update होण्याचं घेतलेलं पाऊल
- DD KISAN 26 MAY रोजी शेतकऱ्यांवरील सादरीकरणाद्वारे करणार AI युगात पदार्पण🤞
(26 May 2015 = DD KISAN स्थापना दिवस)
- दोन AI अँकर द्वारे होणार निवेदन (क्रिश आणि भूमी)
3) भारतातील पहिल्या महिला वकील कार्नेलीय सोराबजी
- जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात
- बॅरिस्टर म्हणून नाव नोंदणीच्या गौरवशाली घटनेला 2024 मध्ये 100 वर्षे पूर्ण
4) भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र ‘पाटणा’ येथे स्थापन
- भारतात 4000 हून अधिक गंगेच्या डॉल्फिन: भारतीय वन्यजीव संस्था
- वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गंगा नदीच्या पात्रात 4000 हून अधिक डॉल्फिन सापडले आहेत.
- गंगेतील डॉल्फिन ‘सुसू’ या नावाने देखील ओळखला जातो
- गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळणाऱ्या नदीतील डॉल्फिनपैकी 2000 हून अधिक एकट्या उत्तर प्रदेशात आढळतात.
- उत्तर प्रदेशात डॉल्फिन प्रामुख्याने चंबळ नदीत आढळतात.
- 2009 : डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.
- 2021 : प्रोजेक्ट डॉल्फिन सुरुवात
- IUCN रेड लिस्ट मध्ये = Endangered यादीत
- विक्रमशिला डॉल्फिन अभयारण्य = बिहार
5) इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) चा नवीन सदस्य : स्पेन
- स्पेन आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) मध्ये ९९ वा सदस्य म्हणून सामील झाला आहे.
- नवी दिल्लीतील राजदूत जोस मारिया रिडाओ डोमिंग्वेझ यांनी संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांना मंजुरी दिली.
- 2015 मध्ये COP21 दरम्यान भारत आणि फ्रान्सने सह-स्थापलेल्या, ISA चे उद्दिष्ट सदस्य देशांमध्ये सौरऊर्जेच्या उपयोजनाला प्रोत्साहन देणे, ऊर्जा प्रवेश, सुरक्षा आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी संक्रमण वाढवणे हे आहे
6) ‘विको’चे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचे निधन
- प्रसिद्ध उद्याोगपती आणि ‘विको’ कंपनीचे अध्यक्ष यशवंत केशव पेंढरकर यांचे नागपूर येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले
- एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्याोगिक विश्वात ओळखले जाणारे यशवंत पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती.
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला फायदा झाला.
- ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळानुरूप बदल करीत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत.
- त्याच्या कारकीर्दीतच कंपनीला ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel