Current Affairs | चालू घडामोडी | 26 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 26 MAY 2024

1) 26 मे

1.1) डी डी किसान चॅनल सुरुवात = 26 मे 2015

1.2) राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) जयंती

  • साहित्य = एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुन्यप्रभाव
  • नाटक = भावबंधन

2) रेमल चक्रीवादळ

  • त्याचे रूपांतर महाचक्रीवादळात होणार आहे. त्याची गती ताशी १२० ते १३५ किमीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे
  • ‘रेमल’ या शब्दाचा अर्थ वाळू असा होतो. हे नाव ओमान देशाने दिले आहे.

3) शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना ‘शॉ पुरस्कार’ जाहीर

  • खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘शॉ पुरस्कार’ या वर्षी भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
  • कुलकर्णी हे ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते लेखिका सुधा मूर्ती यांचे बंधू आहेत
  • ‘शॉ पुरस्कार’ हा ‘पूर्वेचा नोबेल पुरस्कार’ म्हणून ओळखला जातो.
  • मिलिसेकंद पल्सर, गॅमा किरणे स्फोट, सुपरनोव्हा आणि इतर अल्पजीवी खगोलशास्त्रीय घडामोडी यामध्ये लावलेल्या अभूतपूर्व शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे
  • हाँगकाँगमधील दिवंगत रुन रुन शॉ हे दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते, त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.
  • खगोलशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र आणि गणित या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रत्येकी १२ लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

4) लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर

  • महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक ७१.८८ टक्के तर, उच्चभ्रू दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी ५०.०६ टक्के मतदान झाले.
  1. गडचिरोली
  2. कोल्हापूर
  3. हातकणंगले
  4. बीड
  5. नंदुरबार
  6. दक्षिण मुंबई

5) स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार = मूलभूत हक्क (कलम 21)

  • एम. सी. मेहता वि. भारतीय संघराज्य (१९८६) खटला – प्रदुषणमुक्त पर्यावरणात जगण्याचा हक्क आहे मुलभूत हक्क (कलम २१)
  • रबीन मुखर्जी वि. पश्चिम बंगाल (१९८५) खटला – ध्वनी प्रदूषण हे जगण्याच्या हक्काचे उल्लंघन (कलम २१)

6) चिदानंद आणि अनसूया सेनगुप्ता यांनी 77 व्या फ्रान्स मध्ये आयोजित कान्स चित्रपट महोत्सवात रचला इतिहास

  • चिदानंद नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ‘ला सिनेफ’ पुरस्कार मिळाला
  • अनसूया सेनगुप्ता हिला तिच्या ‘शेमलेस’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.
  • 1946 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला कान चित्रपट महोत्सव आता जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो.

7) T20 ब्रँड ॲम्बेसेडर…4 व्यक्ती

  1. युवराज सिंग
  2. Cris गेल
  3. उसेन बोल्ट
  4. शाहिद आफ्रिदी
  • यंदा 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक होणार आहे. 

8) नौदलातील वरिष्ठ अधिकारी व्हाईस ॲडमिरल गुरचरणसिंग ‘NDA’चे नवे कमांडंट

  • ‘NDA’ चे मावळते कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून त्यांनी कमांडंट पदाची सूत्रे स्वीकारली.
  • नौदलात INS रणजीत आणि INS प्रहार या युद्धनौकांवर त्यांनी काम केले आहे.
  • गुचरणसिंग भारतीय बनावटीच्या तीन युद्धनौकांवर सुरुवातीच्या काळात (कमिशनिंग क्रू) काम करण्याची संधी मिळाली.
  • त्यांनी INS ब्रह्मपुत्रा  या युद्धनौकेवर गनरी ऑफिसर, INS शिवालिक या युद्धनौकेवर कार्यकारी अधिकारी आणि INS कोची, INS विद्युत, INS कुकरी या युद्धनौकांवर कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे.
  • नौदलाचा प्रशिक्षण तळ (गनरी स्कूल) असलेल्या आयएनएस द्रोणाचार्य येथे प्रशिक्षक व गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे उपसमादेशक (डेप्युटी कमांडंट) म्हणूनही काम केले आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment