Current Affairs | चालू घडामोडी | 27 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 27 MAY 2024

1) पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी = 27 मे 1964

2) लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्राने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

  • जनरल पांडे यांची सेवा ३१ मे रोजी समाप्त होणार होती. आता ते ३० जूनपर्यंत पदावर कायम राहतील.
  • सैन्याच्या प्रमुखांना अशाप्रकारे मुदतवाढ देण्याचा निर्णय दुर्मीळ आणि असामान्य आहे. यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना तत्कालीन लष्करप्रमुख जनरल गोपाल गुरुनाथ बेवूर यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

3) ‘अन्नसुरक्षा’ हा अनुच्छेद २१ मधील जगण्याच्या हक्काचा भाग ठरल्यावर, गरजूंना मोफत धान्य ही राज्ययंत्रणेची जबाबदारी ठरली

  • अन्नसुरक्षेच्या मुद्द्याचा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४७ मध्ये समावेश झाला
  • १९७४ साली जागतिक अन्न परिषद रोम येथे पार पडली. या परिषदेत प्रत्येक लहान मुलाला, पुरुषाला आणि स्त्रीला अन्नसुरक्षेचा अधिकार आहे, असे घोषित केले गेले. भारतही या परिषदेत सहभागी होता; मात्र अन्नसुरक्षेच्या हक्काची सुस्पष्ट मांडणी केलेली नव्हती.
  • २००१ मध्ये पब्लिक युनियन सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या खटल्यात निकाल = अन्नसुरक्षेचा अधिकार २८ नोव्हेंबर २००१ रोजीच्या निकालात अधिकृतपणे मान्य
  • 2013 = ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा’
  • अंत्योदय अन्न योजना
    • ग्रामीण भागातील ७५ टक्के लोकांना आणि शहरी भागातील ५० टक्के लोकांना किमान किमतीमध्ये पाच किलो रेशनचे धान्य
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
    • जन्माला येणाऱ्या अपत्याचे पोषण चांगले व्हावे यासाठी गर्भवती महिलांना/ मातांना दरमहा ६००० रुपये देण्याची तरतूद

4) २.११ लाख कोटींचा लाभांश देण्याइतका नफा रिझर्व्ह बँक कमावते कुठून?

  • रिझर्व्ह बँकेच्या कमाईचे स्राोत काय?
  1. चलनी नोटांची छपाई, नाण्यांचे मुद्रण आणि त्यांचे व्यापारी बँकांना वितरण हा तिच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्राोत आहे. या प्रक्रियेला ‘सिनोरेज’ असा तांत्रिक शब्द वापरात येतो.
  2. व्यापारी बँकांना गरज पडेल तसे ठरलेल्या रेपो दराने (जो सध्या ६.५ टक्के आहे) रिझर्व्ह बँकेकडून कर्ज दिले जाते. त्यावरील व्याज (रेपो दर) हा तिचा उत्पन्न स्राोत असतो.
  3. मध्यवर्ती बँक परदेशांतील रोख्यांमध्ये गुंतवणूक करून आंतरराष्ट्रीय चलनांत उत्पन्न कमावते.
  4. रिझर्व्ह बँकेकडे देशातील परकीय चलन मालमत्ता आणि सुवर्णसाठ्याची मालकी असते. रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशाची परकीय चलन गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे अलीकडेच जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेला या मालमत्तेतून व्याज रूपाने आणि आर्बिट्राज उलाढालीतून मोठी कमाई होत असते.

5) 17 वी IPL स्पर्धा  🏆

◾️विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर
◾️उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद

🏏 SRH : 113 धावा ( First Batting )
🏏 KKR : 8 गडी राखून विजयी
🏏कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली

🛑 INDIAN PREMIERE LEAGUE – 2024 🛑
——————————————————
🏆विजेता संघ – कोलकाता नाईट रायडर्स
🏆उपविजेता संघ – सनराइजर्स हैदराबाद
__

🏆 मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर – सुनील नरेन
🏏ऑरेंज कॅप विजेता – विराट कोहली सर्वाधिक धावा ( 741 )
🎾 पर्पल कॅप विजेता – हर्षल पटेल 24 विकेट्स__

♦️एकूण सहभागी संघ – 10
♦️सीजन – 17 वा
♦️स्पॉन्सर – TATA
♦️शेवटचा सामना – एम.ए.चिदंबरम स्टेडियम चेन्नई
♦️सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैद्राबाद – 287 धावा
♦️IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला खेळाळू  – युजेवेन्द्र चहल
♦️सर्वात महाग खेळाळू – मिचेल स्टार्क

7) देशाचा खजिना विक्रमी पातळीवर

  • विदेशी गंगाजळी प्रथमच 648.7 अब्ज डॉलरवर ; अर्थव्यवस्था सुसाट

8) दीपा कर्माकरने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले

  • दीपाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या व्हॉल्टमध्ये 13.566 च्या सरासरी गुणांसह ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले, जे या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक ठरले.
  • दक्षिण कोरियाच्या किम सोन हयांग आणि जो क्योंग-बायोल यांनी अनुक्रमे 13.466 आणि 12.966 गुणांसह रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.
  • हा विजय दीपाच्या अष्टपैलू प्रकारात 16 व्या स्थानावर आहे, जिथे तिने 46.16 गुण मिळवले परंतु पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा गमावला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment