Current Affairs | चालू घडामोडी | 28 MAY 2024
1) 28 मे
1.1) भाई माधवराव बागल जयंती = 28 मे 1895
- प्रजापरिषद स्थापना = 1939
- शेतकरी आणि कामगार पक्ष स्थापना = 1947
1.2) स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती = 28 मे 1883
2) विशाखा गाइडलाइन्स = 1997
- कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या ‘विशाखा गाइडलाइन्स’चे मूळ भंवरी देवीच्या बालविवाहविरोधी लढ्यात आहे
- भंवरी देवी या राजस्थानमधल्या जयपूरपासून साधारण पन्नासेक किलोमीटर दूर असलेल्या भटेरी गावातील बाईवर लैंगिक अत्याचार झाले
- ‘विशाखा’ या बिगर शासकीय संस्थेने जनहित याचिका दाखल केली. १९९७ साली याचिकेच्या सुनावणी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या विरोधात मार्गदर्शक सूचना मांडल्या. ‘विशाखा गाइडलाइन्स’ या नावाने या सूचना प्रसिद्ध आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषण विरुद्ध .
- भंवरी देवी खटल्यात अनुच्छेद १४, १५, १९ आणि २१ यांमध्ये अभिप्रेत असलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे न्यायालयाने मांडले. जगण्याचा हक्क मान्य करणाऱ्या अनुच्छेद २१ नुसार, लैंगिक शोषणाच्या विरोधात प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे, असे निकालपत्रात म्हटले गेले.
- विशाखा गाइडलाइन्सचा आधार घेत २०१३ साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी कायदा केला गेला. या कायद्यामुळे लैंगिक शोषणाची व्याख्या निर्धारित झाली.
3) डीआरडीओचे प्रमुख समीर व्ही. कामत यांना मुदतवाढ
- कामत यांची २५ ऑगस्ट २०२२ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास (डीडीआर अँड डी) विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ‘डीडीआर अँड डी’ सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष म्हणून कामत यांची सेवा १ जून २०२४ ते ३१ मे २०२५ किंवा पुढील आदेश येईपर्यंत एक वर्षासाठी वाढवण्यास मान्यता दिली आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel