Current Affairs | चालू घडामोडी | 29 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 MAY 2024

1) माउंट एव्हरेस्ट दिवस

  • सर एडमंड हिलरी (न्यूझीलंड) व तेंझिंग नॉर्गे (नेपाळ) हे एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती ठरले = 1953

2) खासगीपणाचा अधिकार = कलम 21 मधील जगण्याच्या अधिकारात अंतर्भूत

  • ‘पेगॅसस’प्रकरणी जो तपास झाला त्याला आधार होता, अनुच्छेद २१ मधील जगण्याच्या अधिकारात समाविष्ट खासगीपणाच्या अधिकाराचा
  • २०१७ सालच्या आधारविषयक पुत्तुस्वामी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एकमताने खासगीपणाचा मूलभूत अधिकार मान्य केला. अनुच्छेद २१ मधील जगण्याच्या अधिकारातच हा अधिकार सामाविष्ट आहे, असे सांगितले.
  • खासगीपणाचा अधिकार याचा अर्थ काहीतरी चोरून, इतरांपासून लपवून चुकीचे कृत्य करण्याचा प्रकार नव्हे. आपला खासगी अवकाश सुरक्षित रहावा, यासाठीचा हा अधिकार आहे
  • जॉर्ज ऑर्वेल यांची ‘१९८४’ नावाची प्रख्यात कादंबरी आहे. या कादंबरीमधील सुप्रसिद्ध वाक्य आहे: ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू!’ अर्थात, हुकूमशहांचे तुमच्याकडे लक्ष आहे.

3) स्पेन, नॉर्वे, आयर्लंडची पॅलेस्टाइनला अधिकृत मान्यता

  • इस्रायलने गाझावरील लष्करी हल्ले सौम्य करावेत यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचा भाग म्हणून या तिन्ही देशांनी हा निर्णय घेतला आहे
  • पॅलेस्टाइनला आतापर्यंत १४० देशांनी मान्यता दिली आहे. ही संख्या संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांच्या दोनतृतीयांशपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या ताकदवान पाश्चात्त्य देशांचा समावेश नाही.

4) चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे मालवाहू जहाज मुंद्रा बंदरमध्ये दाखल

  • एमएससी ॲना असे या जहाजाचे नाव असून, त्याची लांबी ३९९.९८ मीटर आहे.
  • सर्वसाधारणपणे या जहाजाच्या आकारात चार फुटबॉल मैदाने सामावू शकतात. २० फूट लांबीचे १९,२०० कंटेनर वाहून नेण्याची जहाजाची क्षमता आहे. मुंद्रा बंदरात १२ हजार ५०० कंटेनरची होणार चढ-उतार
  • या आधी आले होते एमएससी हॅम्बर्ग हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज होते. या हॅम्बर्गची लांबी ३९९ मीटर होती व क्षमता होती १६ हजार ६५२ कंटेनरची होती

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment