Current Affairs | चालू घडामोडी | 30 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 30 MAY 2024

1) उदंत मार्तंड प्रकाशित = 30 मे 1826

  • पहिले हिंदी वृत्तपत्र
  • स्थळ = कलकत्ता

2) RBI ने सरकारी रोखे बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागासाठी मोबाइल ॲप जारी करण्यात आले. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ‘प्रवाह’ पोर्टल सुरू करण्यात आले

  • PRAVAH पोर्टल = Platform for Regulatory Application, Validation and Authorisation
  • याअंतर्गत एकीकडे मोबाइल ॲपद्वारे, रिटेल गुंतवणूकदार आता त्यांच्या स्मार्टफोनवर सरकारी सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करू शकतात
  • सरकारी रोखे काय आहेत?
    • सरकारी रोखे (सिक्युरिटीजमध्ये G-Sec), भारत सरकार आणि राज्य सरकारांद्वारे एक पेपर जारी केला जातो, ज्याच्या आधारे त्यांना बाजारातून कर्ज मिळते.
    • सरकारकडे हा कागद आहे, ज्याच्या आधारे ते बाजारातून कर्ज घेऊ शकतात. या सरकारी कागदावरही सरकारची हमी असते. या सिक्युरिटीजनाही सामान्यतः सर्वांत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

3) दिल्ली मध्ये आजवरचे विक्रमी तापमान नोंदवले गेले = 52.9 अंश सेल्सिअस

  • राजस्थानातील वाळवंटावरून अतिशय उष्ण वारे दिल्लीकडे येत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे हवामान विभागाचे क्षेत्रीय प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले
  • ५० अंश सेल्सिअसवर धोका काय?
    • मानवी शरीरासाठी ३७ अंश सेल्सिअस हे तापमान सर्वात योग्य आहे. या तापमानात सर्व अवयव पूर्ण क्षमतेने काम करतात.
    • तापमान ४० ते ५० अंशांच्या दरम्यान असेल, तर त्याचा परिणाम महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर होतो. शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी उष्णता बाहेर टाकणे आवश्यक असते. वातावरण उष्ण असेल, तर यात अडचणी येतात.
    • त्यामुळे हृदय, किडनी यांसारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवांवर ताण येतो. यामुळे काही वेळा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते किंवा प्रसंगी उष्माघाताने मृत्यूही होण्याचा धोका असतो.

4) स्टँडर्ड अँड पुअर या जागतिक पतमानांकन संस्थेकडून पत-दृष्टिकोन ‘स्थिर’वरून ‘सकारात्मक

  • जागतिक पतमानांकन संस्था एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने देशाच्या पतमानांकनाबाबत दृष्टिकोन ‘स्थिर’ वरून ‘सकारात्मक’ असा सुधारला असून, पतमानांकन मात्र ‘बीबीबी (-) उणे’ असे कायम ठेवले आहे
  • विविध योजना आणि विकासकामांवरील वाढता सरकारी खर्च आणि विकासवेग मजबूत राहिल्याने दृष्टिकोनात सुधारणा करण्यात आली आहे.
  • भारताचे ‘बीबीबी-‘ हे पतमानांकन सर्वात खालच्या गुंतवणूक श्रेणीतील आहे. त्यात गेल्या २५ वर्षात बदल झालेला नाही. तर भारतविषयक दृष्टिकोन याआधी २०१० मध्ये ‘नकारात्मक’ वरून ‘स्थिर’ असा करण्यात आला होते. आता तो आणखी सुधारून ‘सकारात्मक’ केला आहे

5) सार्वभौम पतमानांकन म्हणजे काय ?

  • कोणत्याही देशाचे पतमानांकन ठरवताना त्या देशाने प्रसिद्ध केलेली नियत आकडेवारी, विविध वित्तसंस्था, संशोधन संस्था यांच्याकडून वेळोवेळी प्रकाशित होत असलेली आकडेवारी, कंपन्यांचे वार्षिक तिमाही अहवाल अशा सर्वांचा अभ्यास करून मानांकन दिले जाते.
  • यामध्ये देशाच्या कर्जाची पातळी, कर्जफेडीचा इतिहास, अर्थव्यवस्थेचा दरडोई उत्पन्नाचा स्तर, महागाई दर, व्याजदर, व्यापार तूट, विकासदर आदी अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शविणाऱ्या पैलूचा विचार केला जातो.
  • याचबरोबर बऱ्याचदा अर्थतज्ज्ञ, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील
    तज्ज्ञांशी चचदिखील केली जाते. देशातील राजकीय स्थैर्य, भ्रष्टाचाराचे प्रमाण आणि देशाची संस्थात्मक आणि प्रशासनात्मक व्यवस्था याचा देखील सार्वभौम पतमानांकन निश्चित करताना विचार केला जातो.
  • पतमानांकन संस्थांकडून वेळोवेळी वरील गोष्टींचा आढावा घेऊन मानांकन बदलले जाते. म्हणजेच त्यात सुधारणा अथवा घसरणदेखील या संस्थांकडून केली जात असते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment