Current Affairs | चालू घडामोडी | 31 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 31 MAY 2024

1) 31 मे 2024

1.1) अहिल्याबाई होळकर जयंती = 31 मे 1725

  • स्थळ = चौंडी, जामखेड, अहमदनगर
  • अहिल्याबाई होळकर योजना = 1996
    => 5 वी ते 10 वी ग्रामीण भागातील मुलींना प्रवास भाड्यात 100% सवलत

1.2) डॉ. भाऊ दाजी लाड यांची 150 वी पुण्यतिथी = 31 मे 1874

2) CAA नागरिकत्व देण्यास सुरुवात

  • प. बंगाल , हरियाणा,उत्तराखंड मधून सर्वप्रथम सुरुवात
  • CAA कायदा
    • बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या छळ झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे
    • डिसेंबर 2019 मध्ये CAA कायदा लागू

3) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नुकताच अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे.

  • तो विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला आहे
  1. आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोक संदर्भासाठी देण्यात आला आहे. श्लोकाचा अर्थ चांगला असला तरी तसा दुसऱ्या ग्रंथातील श्लोक वापरता आला नसता का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  2. त्याशिवाय तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
  3. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी.
  4. भारतीय ऋषींची दिनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

4) मध्यप्रदेशातील गांधीसागरमध्ये केनियातून चित्ते येणार!

  • चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून आठ आणि १२ असे एकूण वीस चिते आणले गेले. मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ते आता स्थिरावले आहेत.
  • कुनोत सध्या २७ चित्ते
    • नामिबिया येथून भारतात १७ सप्टेंबर २०२२ ला आठ चित्ते तर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले गेले.
    • दरम्यान, गेल्यावर्षी मार्चपासून ‘ज्वाला’ने जन्म दिलेल्या तीन बछड्यांसह दहा चित्त्यांचा मृत्यू झाला.
    • कुनोत सध्या २७ चित्ते आहेत. भारतात जन्मलेल्या १४ बछड्यांचा त्यात समावेश आहे.

5) ‘अग्निकुल’च्या अग्निबाण रॉकेटची यशस्वी उप-कक्षीय चाचणी = 30 मे 2024 रोजी

  • चेन्नईस्थित स्पेस स्टार्ट-अप अग्निकुल कॉसमॉसने श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळावरून स्वदेशी विकसित थ्रीडी-प्रिंटेड सेमी-क्रायोजेनिक रॉकेट अग्निबाणची उप-कक्षीय चाचणी यशस्वीरित्या पार पडली
  • अग्निकुल कॉसमॉस ही कामगिरी करणारी भारतातील दुसरी खासगी संस्था ठरली आहे. पहिली = स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (विक्रम रॉकेट)
  • श्रीहरिकोटा येथील एसटीएससी-एसएपएआर येथे भारतातील पहिल्या आणि एकमेव खासगी प्रक्षेपण साइटवरून हे यश प्राप्त झाले.
  • या नियंत्रित उड्डाणात मिशनचे सर्व लक्ष्य साध्य झाले.
  • लॉन्च व्हेईकल पूर्णपणे स्वदेशी डिझाइन केलेले होते आणि ते जगातील पहिले ‘थ्रीडी-प्रिंटेड सिंगल इंजिन’ द्वारे समर्थित होते
  • 2021 मध्ये, भारत सरकारने भारतीय अंतराळ उद्योग खाजगी क्षेत्र आणि स्टार्ट-अपसाठी खुला करण्यासाठी इंडियन स्पेस असोसिएशन (ISpA) लाँच केले .

5) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदची कार्लसनवर सरशी

  • प्रज्ञानंदने पारंपरिक प्रकारात प्रथमच पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनवर मात करताना नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या गुणतालिकेत आघाडी मिळवली
  • प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशाली ही देखील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला विभागातील आपले वर्चस्व कायम राखले आहे.

6) FEMA नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल RBI ने HSBC बँकेला दंड ठोठावला आहे

  • RBI च्या मते, HSBC बँक FEMA च्या ‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम’ अंतर्गत आवश्यक रिपोर्टिंग आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली
  • लिबरलाइज्ड रेमिटन्स योजना म्हणजे काय?
    • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2004 मध्ये FEMA कायदा 1999 अंतर्गत लिबरलाइज्ड रेमिटन्स योजना सुरू केली होती.
    • या योजनेअंतर्गत, अल्पवयीनांसह सर्व निवासी व्यक्ती एका आर्थिक वर्षात (एप्रिल ते मार्च) $2,50,000 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय परदेशात पाठवू शकतात.
  • Foreign Exchange Management Act (FEMA) = 1999

7) DRDO ने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र RudraM-II ची यशस्वी चाचणी घेतली

  • 28 मे 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या Su-30 MK-I लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र यशस्वीपणे डागण्यात आले
  • RudraM-II हे क्षेपणास्त्र हवेतून पृष्ठभागावर (Air to Surface) मारा करणारे क्षेपणास्त्र आहे जे जमिनीवर लक्ष्य करण्यासाठी लढाऊ विमानाने प्रक्षेपित केले जाऊ शकते
  • हे क्षेपणास्त्र पहिले स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे जे शत्रूच्या जमिनीवर रडार आणि पाळत ठेवणारी यंत्रणा लक्ष्य करण्यासाठी शत्रूच्या हवाई संरक्षण (SEAD= Suppression of Enemy Air Defence) मोहिमेचा एक भाग म्हणून विकसित केले गेले आहे.
  • हे रडार, रेडिओ फ्रिक्वेन्सी मालमत्ता आणि इतर दळणवळण उपकरणांसह शत्रूची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

8) राकेश रंजन Staff Selection Commission (SSC) चे नवे अध्यक्ष

  • कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे विशेष सचिव राकेश रंजन यांची कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • SSC स्थापना : 4 नोव्हेंबर 1975

9) TCS आणि IIT-बॉम्बे भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करणार

  • या प्रगत सेन्सिंग टूलचे उद्दिष्ट सेमीकंडक्टर चिप्सच्या तपासणीमध्ये अचूकतेचे नवीन स्तर अनलॉक करणे, चिपचे अपयश कमी करणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे हे आहे.
  • हा प्रकल्प राष्ट्रीय क्वांटम मिशनशी संरेखित आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment