Current Affairs | चालू घडामोडी | 01 JUN 2024
1) 1 जून
1.1) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंमल = 1 जून 2011
- लाभार्थी = गर्भवती महिला व आजारी नवजात बालक
1.2) जागतिक दुग्ध दिन- १ जून
- संकल्पना २०२४ – जगाचे पोषण करण्यासाठी दर्जेदार पोषण वितरीत करण्यात दुग्ध व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो
2) भारतीय लष्करी अधिकारी मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांच्या हस्ते संयुक्त राष्ट्राचा लिंगभेद निर्मूलनविषयक पुरस्कार देण्यात आला
3) चक्रीवादळ धडकलेली तारीख आणि कंसात नामकरण करणाऱ्या देशांचे नाव :-
- मोचा – 10 में 2023 (येमेन)
- बाधित क्षेत्र : भारत, बांगलादेश & म्यानमार
- बिपरजॉय – 15 जून 2023 (बांग्लादेश)
- बाधित क्षेत्र :- गुजरात व राजस्थान
- तेज- 21 ऑक्टोबर 2023 (भारत)
- बाधित क्षेत्र = ओमान आणि येमेन किनारपट्टी
- हॅमून – 25 ऑक्टोबर 2023 (इराण)
- बाधित क्षेत्र :- Northwest Bay of Bengal
- मिधिली – 15 नोव्हेंबर 2023 (मालदीव)
- बाधित क्षेत्र :- भारत आणि बांगलादेश
- मिचौंग- 5 डिसेंबर 2023 (म्यानमार)
- बाधित क्षेत्र : तामिळनाडू किनारपट्टीवर धडकले होते.
- रेमल:- 26-31 मे 2024 (ओमान)
- 2024 पूर्व मान्सून हंगामात धडकणारे हे पहिले चक्रीवादळ
- बाधित क्षेत्र : भारतातील प. बंगाल व ओडिशा किनारपट्टीसह, आसाम, मेघालय, मिझोराम या प्रदेशावर आणि बांगलादेशातील किनारपट्टी भागात नुकसान झाले आहे
4) ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये काय फरक आहे ?
- ओपिनियन पोल (Opinion Poll)
- सर्वेक्षण संस्था निवडणुकीआधी ओपिनियन पोल घेतात आणि त्यात सर्व लोकांचा समावेश केला जातो. मग तो मतदार असो, वा नसो.
- जनमत चाचण्यांच्या निकालांसाठी, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्यांवर जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
- या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात जनता सरकारवर नाराज आहे की, त्यांच्या कामावर समाधानी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
- एक्झिट पोल (Exit Poll)
- मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल घेतला जातो, ज्यामध्ये फक्त मतदारांचा समावेश केला जातो.
- एक्झिट पोलमध्ये फक्त अशाच लोकांना समाविष्ट केले जाते, जे मतदान केल्यानंतर बाहेर पडतात.
- निर्णायक टप्प्यात एक्झिट पोल होतो. यावरुन लोकांनी कोणत्या पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे, याची माहिती जाणून घेतली जाते.
- मतदान पूर्ण झाल्यानंतरच एक्झिट पोल प्रसारित केले जातात,
- एक्झिट पोलचा इतिहास ?
- डच समाजशास्रज्ञ आणि राजकारणी मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल सुरु केला होता.
- बॉन डॅमने 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिल्यांदा याचा वापर केला. त्यावेळी नेदरलँडमध्ये झालेल्या निवडणुकांबाबत त्यांनी केलेले आकलन अगदी अचूक होते.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे (IIPL) प्रमुख एरिक डीकोस्टा यांनी भारतातील एक्झिट पोल सुरु केले होते.
- 1996 मध्ये एक्झिट पोलची सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यावेळी दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजला (CSDS) देशभरातील एक्झिट पोल घेण्यास परवानगी दिली होती.
- 1998 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.
5) वार्षिक ‘जीडीपी’वाढ ८.२ टक्क्यांवर
- देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (जीडीपी) जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्क्यांची वाढ दर्शविली, असे सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.
- याआधीच्या तिसऱ्या तिमाहीतील ८.६ टक्क्यांच्या तुलनेत त्यात लक्षणीय घसरण झाली असली तरी बहुतांश अर्थविश्लेषकांच्या अपेक्षानुरूप ही आकडेवारी आली आहे.
- उल्लेखनीय म्हणजे जाहीर झालेल्या दुसऱ्या अंदाजानुसार, २०२३-२४ या संपूर्ण वर्षाचा ‘जीडीपी’ मात्र, मागील वर्षातील ७.६ टक्क्यांच्या तुलनेत दमदार ८.२ टक्क्यांपर्यंत सुधारण्यात आला आहे
- याआधी २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७ टक्के होता
- जगात सर्वात वेगवान वाढ म्हणून भारत आघाडीवर राहिलेला आहे
- भारताच्या खालोखाल चीनने, २०२३-२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत ५.३ टक्के दराने अर्थव्यवस्थेत वाढ नोंदवली आहे.
6) थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
- गेल्या वर्षभरात (एप्रिल ते मार्च २०२३-२४) राज्यात १ लाख २५ हजार कोटींची थेट विदेशी गु्तंवणूक झाली असून, सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक कायम राखला आहे.
- गेल्या पाच वर्षांत देशात झालेल्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे.
- इंडेक्स
- महाराष्ट्र
- गुजरात
- तेलंगणा
7) विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधानांकडून ‘सूर्य अर्घ्य’ अर्पण
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel