Current Affairs | चालू घडामोडी | 02 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 02 JUN 2024

1) तेलंगणा राज्य निर्मिती = 2 जून 2014 (29 वे राज्य)

  • आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम = 2014
  • राजधानी = हैदराबाद
  • द्विगृही कायदेमंडळ
  • पहिले मुख्यमंत्री = के चंद्रशेखर राव
  • उर्दू = दुय्यम भाषा दर्जा
  • प्रथम भाषा = तेलगू

2) भारताने इंग्लंडमध्ये ठेवलेले १०० टन सोने सरलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या तिजोरीत हलवले आहे

  • वर्ष १९९१ मध्ये परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशाला इंग्लंडकडे सोने गहाण ठेवावे लागले होते. मात्र नंतर कर्जाची परतफेड केल्यानंतरही ते सोने इंग्लंडमध्येच ठेवण्यात आले होते.
  • आता रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा ८२२ मेट्रिक टनांवर पोहोचला असून सरलेल्या आर्थिक वर्षात त्यात २७.४६ मेट्रिक टन सोन्याची भर पडली आहे.
  • मौल्यवान धातू असलेल्या सोन्याचा बराचसा भाग परदेशात साठवला जातो. इतर देशांप्रमाणे देशाचे सोने ब्रिटनची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये आहे.
  • देशात १०० टन सोने पुन्हा आणल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडील देशांतर्गत गंगाजळीतील सुवर्ण-साठा ४०८ टनांपेक्षा अधिक झाला आहे, याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडील देशात असलेला सोन्याचा साठा आणि परदेशी असलेला सोन्याचा साठा आता समान पातळीवर आला आहे.

3) ‘एलआयसी’ची मालमत्ता पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळच्या ‘जीडीपी’पेक्षा अधिक

  • देशातील सरकारी मालकीची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’च्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) ५० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, बांगलादेशचा जीडीपी ४५५ अब्ज डॉलर आहे. तर ‘एलआयसी’ची एकूण मालमत्ता ६१६ अब्ज डॉलर आहे. याचबरोबर पाकिस्तान (३३८.२४ अब्ज डॉलर), श्रीलंका (४४.१८ अब्ज डॉलर), नेपाळ (७४.८५ अब्ज डॉलर) या देशांच्या एकत्रित जीडीपीहूनदेखील ‘एलआयसी’ची मालमत्ता अधिक भरणारी आहे.
  • भांडवली बाजारात ‘एलआयसी’ सहावी सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
  • १९.४९ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यांकनासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
  • ‘एलआयसी’चे समभाग मे २०२२ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले. सरकारने ‘आयपीओ’च्या माध्यमातून ‘एलआयसी’तील ३.५ टक्के हिस्सा त्यावेळी विकला होता. सध्या ‘एलआयसी’मध्ये केंद्र सरकारची ९६.५ टक्के मालकी आहे.

4) ताशिगंग लाहैल स्पिती (हिमाचल प्रदेश) जगातील सर्वात उंच मतदान केंद्र

100% मतदान
एकूण मतदार -62

उंची – 15,256 feet

5) रेड फ्लॅग युद्धसराव 2024

  • भारतीय वायुसेनेने (IAF) बहुराष्ट्रीय रेड फ्लॅग सरावात सहभागी होण्यासाठी आपले सर्वात प्रगत लढाऊ विमान राफेल युनायटेड स्टेट्समधील अलास्का येथील आयलसन हवाई दल तळावर उतरवले आहे.
  • हा दोन आठवड्यांचा लष्करी सराव आहे जो 30 मे 2024 रोजी सुरू होईल आणि 14 जून 2024 रोजी संपेल. 
  • सुरुवात : व्हिएतनाम युद्धानंतर युनायटेड स्टेट्स एअर फोर्सने 1975 मध्ये रेड फ्लॅग सराव सुरू केला होता.

6) संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज निवृत्त

  • संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज या निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी 35 वर्षे परराष्ट्र सेवा अधिकारी म्हणून काम केले आहे.
  • संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला मुत्सद्दी होत्या.

7) दिनेश कार्तिकची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

  • दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
    • दिनेश कार्तिकने 3 नोव्हेंबर 2004 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर कार्तिकने अखेरचा आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामना हा बांगलादेश विरुद्ध 2 नोव्हेंबर 2022 रोजी खेळला होता.
    • कार्तिकने 94 वनडे, 60 टी20 आणि 26 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं.
    • दिनेशने वनडे, टी 20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनुक्रमे 1752, 686 आणि 1025 अशा धावा केल्या. तसेच कार्तिकने आयपीएलमधील 257 सामन्यांमधील 234 डावात 3 हजार 577 धावा केल्या.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment