दादोबा पांडुरंग तर्खडकर | Dadoba Pandurang Tarkhadkar

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

जन्म

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबईत म्हणजेच शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते.दादोबा हे  मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते.दादोबाचे वडील हे विठ्ठल भक्त होते. त्यांना दोन भाऊ होते. भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.

प्राथमिक शिक्षण

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने पोर्तुगीज, इंग्रजी, फार्शी आणि संस्कृत ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल ॲन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट झाले. बोर्ड ऑफ एज्ुकेशनने 1840 मध्ये सुरत येथे सुरू केलेल्या पहिल्या शाळेत दादोबाची “असिस्टंट टीचर” म्हणून 150 रूपये वेतनावर नेमणूक झाली. शिक्षण सुरू असताना त्यांनी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक लिहिले.ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले होते पण एका ख्रिश्चन शिक्षकाने सांगितले की ख्रिश्चन समाजातही दोष आहे म्हणून निर्णय बदलला. 1835 साली जावरा संस्थानाच्या नवाबाचे इंग्रजी शिक्षण घेत असत. तेथेच ते फारसी भाषा शिकले. त्यांनी 1844 साली मिठाच्या कराविरुद्ध मोर्चा काढला. 1846 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी ट्रेनिंग कॉलेज चे संचालक म्हणून दादोबांची नियुक्ती करण्यात आली. 1857 साली  इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर पदवी दिली. तसेच ते सरकारी मुलकी अधिकारी झाले. त्याच साली अहमदनगर चे डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. येथेच त्यांनी भिल्लांच्या बंडाचा बीमोड केला.

ग्रंथसंपदा

१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती 1836 साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली. 1836 साली मराठी आणि गुजराती नकाशांचे पुस्तक सुद्धा त्यांनी काढले. त्यांचे आत्मचरित्र पूर्ण होऊ शकले नाही कारण आत्मचरित्र लिहित असताना त्यांचा मृत्यू झाला. तर्खडकरांचे इ.स. १८४६सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी संपादित करून पुनःप्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच, शिवाय त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अश्या काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर झाले आहे.

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मोरोपंतांच्या केकावली वर ‘यशोदा पांडुरंगी’ नावाची टीका लिहिली. ही मराठी समीक्षेची सुरूवात समजली जाते. ते मानवधर्मसभा-1844, परमहंस सभा-1849 (ज्ञानप्रसारक sabha-१८४८) प्रार्थना समाज-1867(आत्माराम पांडुरंग तर्खडकर) ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. ‘शिशुबोध’ हा वैचारिक साहित्यप्रकार मरणोत्तर प्रसिद्ध आहे. 1843 साली धर्मविवेचन हा ग्रंथ लिहला. यमुना पर्यटन या बाबा पद्मनजी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत भाषेत ‘विधवाश्रमार्जन’ पुनर्विवाह विषयक लेख लिहिला. 1878 साली स्वीडिश तत्वज्ञ स्विडनबर्ग यांच्यावरून ‘अ हिंदू जंटलमन रिफ्लेक्शन रेस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युएल स्विडनबर्ग’ या ग्रंथाची त्यांनी रचना केली. सहकारी पुस्तक समितीची स्थापना दादोबानी केली.

सामाजिक आणि धार्मिक कार्य

22 जून 1844 साली त्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर व दुर्गाराम मन्साराम यांनी मिळून मानवधर्म सभा स्थापन केली. दलपतराय भगुभाई, दिनमणीशंकर यांनी त्यांना ही सभा स्थापन करण्यासाठी सहाय्य केले. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. सभेच्या प्रचारासाठी ‘धर्मविवेचन’ हा ग्रंथ लिहिला.
परमहंस सभा/मंडळ 1849 साली स्थापन करण्यात आले. आत्माराम पांडुरंग, भाऊ महाजन, सर रामचंद्र बाळकृष्ण जयकर भिकोबा दादा चव्हाण,तुकाराम तात्या पडवळ, सखाराम शास्त्री यांच्या सहाय्याने ही सभा स्थापन करण्यात केली. लक्ष्मणशास्त्री हळबे, मोरोबा विनोबा, मदन श्रीकृष्णयाच समाजाचे पुढे जाऊन प्रार्थना समाजासाठी प्रेरणास्रोत झाले.या सभेचे कार्य गुप्तपणे चालत असे. दादोबा सभेला हजर देखील राहत नसत. दादोबानी सभेच्या मार्गदर्शनासाठी ‘परमहांसिक ब्रह्मधर्म’ नावाचा काव्यग्रंथ लिहिला. ‘एक जगद्वासी आर्य’ या टोपण नावाने लिहिलेले ‘धर्मविवेचन’ ते सभेत सर्वांना वाचायला देत.
1 सप्टेंबर 1848 रोजी एल्फिन्स्टंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानप्रसारक’ सभेची स्थापना केली. दादोबा या सभेचे अध्यक्ष होते.गोविंद माडगावकर, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, न्या. रानडे हे सदस्य होते.

निधन

त्यांच्या दोन्ही मुलांचे एकामागे एक निधन झाल्याने ते धक्क्यातून सावरू शकले नाहीत. 17 ऑक्टोबर 1882 साली त्यांचे निधन झाले.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment