Current Affairs | चालू घडामोडी | 19 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 19 MAR 2024

1) महार वतन बिल मांडले = 19 मार्च 1928

 • मुंबई कायदेमंडळात मांडणी
 • अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याची मागणी
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे बिल मांडले

2) वीस पटसंख्येपर्यंतच्या शाळांत किमान एक शिक्षक

 • एक ते दहा पटसंख्येच्या शाळेसाठी आवश्यकतेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक दिला जाणार असून, तो उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
 • राज्यात पात्रताधारक बेरोजगार असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय अनाकलनीय आहे
 • शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदी
  • पहिली ते पाचवीसाठी २१० विद्यार्थी संख्येपर्यंत प्रति तीस विद्यार्थ्यांमागे शिक्षकाचे एक पद असेल.
  • २१० विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यांमागे एक पद असेल.

3) रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे विक्रमी मताधिक्याने पाचव्यांदा विजयी झाले

4) अनुदानित शाळांवरच ‘हक्कां’चा भार?

 • सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेमुळे २५ टक्के आरक्षण ठेवण्याची विनाअनुदानित शाळांवरची सक्ती रद्द होणार, मुलांच्या निवासापासून एक कि.मी. परिसरात शाळा असावी या धोरणात्मक अपेक्षेला धक्का लागणारच, पण या बदलामुळे आणखी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत.
 • २००९ च्या शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदीनुसार विनाअनुदानित शाळा, केंद्रीय शाळा, नवोदय आणि सैनिकी शाळांमधील (विनाअनुदानित शाळा) २५ टक्के जागा वंचित गटातील मुलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. ही तरतूद अनुदानित आणि शासकीय शाळांना लागू होत नाही.
 • राज्य शासनाने दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी अधिसूचना काढून २०११ च्या शिक्षणहक्क नियमांत बदल केले.
  • त्यानुसार विनाअनुदानित शाळेपासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित/ शासकीय शाळा असली तर २५ टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद त्या विनाअनुदानित शाळेला लागू होणार नाही; आणि अशी विनाअनुदानित शाळा प्रतिपूर्तीला पात्र ठरणार नाही.
  • अनुदानित आणि शासकीय शाळा प्रत्येक गावात असल्यामुळे बहुसंख्य विनाअनुदानित शाळांवरची २५ टक्के आरक्षणाची सक्ती रद्द होणार आहे.

5) शाळा प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित

 • शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्‍चित केली आहे.
 • त्यानुसार, प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ३१ डिसेंबर २०२४पर्यंत किमान तीन वर्षे आणि कमाल चार वर्षे पाच महिने, तर इयत्ता पहिलीसाठी किमान सहा वर्षे आणि कमाल सात वर्षे पाच महिने अशी वयोमर्यादा ठरविली आहे.

6) निवृत्त सनदी अधिकारी नवनीत कुमार सहगल यांनी प्रसार भारतीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

 • याअगोदर चे अध्यक्ष = ए. सूर्य प्रकाश
 • गेल्या जवळपास चार वर्षांपासून हे पद रिक्त होते.
 • त्यानंतर निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी सेहगल यांची नियुक्ती केली.
 • ही नियुक्ती तीन वर्षांसाठी अथवा सेहगल हे वयाची ७० वर्षे पूर्ण करीपर्यंतच्या कालावधीसाठी असेल.
 • सेहगल हे १९८८ आयएएस च्या तुकडीतील उत्तरप्रदेश केडरचे अधिकारी आहेत. ते 2023 मधे निवृत्त झाले.
 • उपराष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.

7) ‘लमीतीए युद्धसराव- २०२४’

 • भारत आणि सेशेल्स (पूर्व आफ्रिकेतील एक देश) यांच्यातील हा लष्करी सराव आहे.
 • SDF म्हणजेच सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान दहाव्यांदा हा युद्ध सराव होत आहे.
 • 18 ते 27 मार्च 2024 या काळात सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे.
 • क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ- मैत्री- असा होतो.
 • लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव 2001 पासून सेशेल्समध्ये घेतला जातो.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment