Current Affairs | चालू घडामोडी | 18 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 18 MAR 2024

1) रौलट कायदा अंमलात = 18 मार्च 1919

  • कोणत्याही कारणाशिवाय खटला चालविण्याचा व कारागृहात टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला मिळाला

2) निवडणूक रोख्यांतून भाजपला ६,९८६ कोटी

  • तृणमूल काँग्रेसला १,३९७ कोटी
  • काँग्रेसला १,३३४ कोटी तर तेलंगणमध्ये १० वर्षे सत्तेत राहिलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (आधीची तेलंगण राष्ट्र समिती) खात्यात १,३२२ कोटी रुपयांचा निधी जमा झाला.
  • तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने एकूण ६५६.५० कोटी इतका निधी मिळाला. त्यात एकट्या फ्युचर गेमिंगचे द्रमुकला ५०९ कोटी

3) दुसऱ्या महिला प्रीमियर लीग (WPL) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला जेतेपद

  • दिल्ली कॅपिटल्स सलग दुसऱ्यांदा उपविजेते
  • बंगळूरु फ्रेंचायझीचे हे पहिलेच जेतेपद ठरले. बंगळूरुच्या पुरुष संघाला कधीही ‘आयपीएल’ जिंकता आलेली नाही.
  • Women Premier League 2024
    • आवृत्ती – दुसरी
    • सुरुवात – 2023
    • आयोजक – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)
    • विजेता – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (कर्णधार – स्मृती मानधना)
    • उपविजेता – ‌दिल्ली कॅपिटल्स (कर्णधार – मेग लैनिंग)
    • पहिला विजेता – मुंबई इंडियन्स (कर्णधार – हरमनप्रीत कौर)
    • प्लेअर ऑफ द मॅच – सोफी मॉलीनू (RCB)
    • प्लेअर ऑफ द सिरीज – दिप्ती शर्मा(यु पी वॉरियर्स)
    • सर्वाधिक धावा – एलिस पेरी(RCB)
    • सर्वाधिक विकेट्स – श्रेयांका पाटील (RCB)
    • इमर्जिंग प्लेयर – श्रेयांका पाटील (RCB)

4) ‘सी-व्हिजिल’ ॲप :नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा!

  • कोणताही नागरिक निवडणूकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे.
  • या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे.
  • खालील गोष्टींसाठी ‘सी-व्हिजिल’ मार्फत तक्रार करता येईल
    • -मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप.
    • शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.
    • मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.
    • जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.
    • पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी.
    • मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर.
    • मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.
    • उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर.
  • ‘सी-व्हिजिल’ची तक्रार योग्य असल्यास
    • संबंधितांवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयर) नोंदविला जाईल.
    • संबंधितांवर क्रिमीनल अॅक्शन होणार.
    • कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार.
    • कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार.

5) आचारसंहिता म्हणजे काय?

  • देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
  • आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.
  • आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे.
  • निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते.
  • आचारसंहितेची सुरुवात कशी झाली?
    • आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली.
    • तर 1962 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सर्व देशभरात
    • 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली.
  • सर्वसाधारण नियम काय असतात ?
    • सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.

6) पी. व्ही. नरसिंह राव स्मृती पुरस्कार : रतन टाटा यांना प्रदान

  • समाजकल्याण आणि मानवतावादी कारणांसाठी असाधारण समर्पण दाखविणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो
  • रतन टाटा यांना भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील मिळाले आहेत:
    • पद्मविभूषण (2008)
    • पद्मभूषण (2000)
  • पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न : 9 फेब्रुवारी 2024

7) नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा.

  • महाराष्ट्रातील पहिले गाव
  1. पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
  2. पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर
    सातारा)
  3. पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
  4. पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
  5. पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
  6. पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

8) निवडणूक खर्च मर्यादा

  • 2022 मध्ये निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
  • उमेदवारांना लोकसभेसाठी 95 लाख रुपये तर विधानसभेसाठी आता 40 लाख रुपये खर्च करता येणार आहेत. हा निर्णय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश तसेच इतर मोठ्या राज्यांसाठी लागू असणार आहे.
  • तर गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी लोकसभा मतदारसंघात 75 लाख तर विधानसभा मतदारसंघात 28 लाख रुपये खर्च करता येणार आहेत.
  • या आधी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. ती आता वाढवून 95 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.
  • तर विधानसभेसाठी ही मर्यादा 28 लाख रुपये इतकी होती. आता त्यामध्ये वाढ करुन 40 लाख रुपये करण्यात आले आहेत.

9) दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली.

10) फणस संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय : रत्नागिरी

  • रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात फणस संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
  • महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्थाः
    • मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र: पाडेगांव (सातारा).
    • गवत संशोधन केंद्र : पालघर (ठाणे)
    • नारळ संशोधन केंद्र : भाट्ये (रत्नागिरी)
    • सुपारी संशोधन केंद्र : श्रीवर्धन (रायगड)
    • काजू संशोधन केंद्र : वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
    • केळी संशोधन केंद्र : यावल (जळगाव)
    • हळद संशोधन केंद्र : डिग्रज (सांगली)
    • राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज: केगांव (सोलापूर)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment