नाना शंकरशेठ | Nana Shankarsheth

जन्म

नाना शंकरशेठ अर्थात जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाण्यातल्या त्यांच्या मुळगावी मुरबाड इथं झाला. एका दैवज्ञ ब्राम्हणाच्या घरी नानांचा जन्म झाला. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांच्या वडीलांनी जवाहिऱ्यांच्या व्यापारात खूप संपत्ती कमावली होती तसेच त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीचे सावकार होते.नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यांनतर नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली. नानांच्या आईंचं छत्र त्यांच्या डोक्यावरून लवकर हरपलं. जरी त्यांचा जन्म सोनार कुटुंबात झाला असला तरी त्यांनी आपला पारंपारिक व्यवसाय सोडून मुंबईतील पारशी आणि अफगाण व्यापाऱ्यांसोबत व्यवसाय केला आणि मुंबईतील व्यवसायाचा विस्तार करण्याबरोबरच मुंबईच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले.

नाना शंकरशेठ

नाना शंकरशेठ यांनी भूषविलेली पदे

त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली, ज्यात मुंबई प्रांतातील शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम करणे आणि मुंबई विद्यापीठात प्रथम फेलो म्हणून नियुक्ती करणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी महापालिका आयुक्त सदस्य म्हणून त्यांच्या कौशल्याचे योगदान दिले आणि GIP रेल्वेच्या संचालक मंडळावर काम केले. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठून मुंबई प्रादेशिक विधानमंडळाचे पहिले महाराष्ट्रीय सदस्य होण्याचा मान मिळवला. शिवाय, त्यांनी मुंबईतील कमर्शियल बँक ऑफ इंडियामध्ये संचालकपद भूषवले आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या विविध नेतृत्व भूमिकांचे प्रदर्शन केले.

नाना शंकरशेठ यांचे शैक्षणिक कार्य

शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणे शकणार नाही हे नानांना माहिती होतं. त्यांनी लोकांच्या उद्धारासाठी केलेल्या कामांमुळे त्याचे इंग्रजी अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांमुळेच नानांनी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या मदतीने 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. एका भारतीय माणसाने शिक्षणासाठी मुंबईत स्थापन केलेली पहिलीच संस्था होती. यासाठी त्यांनी 2 जणांची मदत घेतली होती बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे. सन 1856 मध्ये त्यांच्याद्वारे मुंबई विद्यापीठाच्या सर्वात जुन्या कॉलेजांमध्ये एक एलिफिंस्टन educational Institution कॉलेज आहे.आपल्या-आपल्या जीवनकालात प्रसिद्ध शिक्षणशास्त्री, समाजसेवी आणि बालशास्त्री जंभेकर, दादा नौरोजी, महादेव गोविंद रानाडे, रामकृष्ण गोपाल भांडारकर, गोपालकृष्ण गोखले आणि बालगंगाधर टिळकसारख्या महान व्यक्तीनी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतले. 1824 साली त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल ची स्थापना केली. पुढे 1834 साली त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय उभारले. 1845 साली ग्रँट मेडिकल कॉलेज ची स्थापना केली.

Student literary and scientific society च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी 1848 साली आपल्या राहत्या घरी शाळा सुरू केली. ही संस्था दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि व्ही एन मंडलिक यांनी स्थापन केली होती. 1855 साली त्यांनी मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय स्थापन केले. जे जे हॉस्पिटल तसेच जे जे स्कूल ऑफ आर्ट उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. डेव्हिड ससून ग्रंथालयाची स्थापना केली. द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल या नावाने त्यांनी 1857 साली हायस्कूल स्थापन केले. नानांनी Town Improvement Committee त्यांनी स्थापन केली. नानांनी स्त्री शिक्षणाचे सुद्धा कार्य केले. 1823 साली सतीप्रथा बंद करण्यासाठी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवला. त्यावर भारतीय लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेठ यांची सही होती. संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे 30,000 रुपये देऊन शिष्यवृत्तीची सोय केली. त्यांचा मुलगा विनायक याने मॅट्रिक च्या परीक्षेसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती स्थापन केली.

राजकीय कार्य

ब्रिटीशांना सुरू केलेल्या रेल्वेची माहिती नाना शंकरशेठ यांना कळली आणि त्यांनी ब्रिटीशांशी अशीच एक गाडी मुंबईच धावावी यासाठी अर्ज केला. त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जमशेतजी जिजिभॉय यांच्याकडे ही कल्पना माडंली आणि या दोघांनी मिळून १८४५ साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. त्यांच्या अविरत प्रयत्नांचं फलित म्हणून ०१ ऑगस्ट १८४९ साली द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे ची स्थापना झाली. 1852 साली बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संस्था स्थापन केली. ही महाराष्ट्रातील पहिली राजकिय संघटना होती. नाना शंकरशेठ यांनी स्वत: अध्यक्षपद भूषविले. जमशेतजी जिजिभॉय हे सन्माननीय अध्यक्ष होते. भाऊ दाजी लाड हे सेक्रेटरी होते. १६ एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली आणि मुंबईच्या विकासात एक महत्वाचा पाया रचला गेला. मुंबईला नानांच्या प्रयत्नांनी वेगवान प्रवास दिला. नानांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक जमीनीही दान दिल्या.नानांच्या या मुंबईवरील प्रेमामुळेच ते १८६२ साली मुंबई प्रांताच्या गव्हर्नरते सल्लागार म्हणूनही नियुक्त झाले होते. नानांनी मुंबईची खरी ओळख बनवली. मुंबईच्या जडणघडणीत नानांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्या याच प्रयत्नांनी मुंबईला वेगवेन शहराची ओळख मिळाली.

इतर कार्य

भायखळा येथे राणीच्या बागेची निर्मिती आणि संपूर्ण मुंबईतील विहिरी आणि तलावांसाठी योजना विकसित करणे, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे यासह अनेक महत्त्वपूर्ण योगदानांनी त्यांचा वारसा चिन्हांकित केला आहे. मुंबईचे सांस्कृतिक भूदृश्य समृद्ध करून नाट्यगृहांच्या स्थापनेपर्यंत त्यांचे अग्रगण्य प्रयत्न विस्तारले. त्यांनी कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या स्थापनेमध्ये त्यांच्या पुढाकारातून उद्योजकीय बुद्धी दाखवली आणि अर्ली हॉर्टिकल्चर अँड जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत, वैज्ञानिक चौकशी आणि शोधांना चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जलवाहतुकीचे महत्त्व ओळखून त्यांनी वाहतूक नेटवर्क सुधारण्याच्या उद्देशाने बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या स्थापनेचे नेतृत्व केले. शिवाय, त्याच्या पुढच्या विचारसरणीमुळे मॉरिशसमधून ऊस आयात करण्याचा उपक्रम सुरू झाला, ज्यामुळे या प्रदेशातील कृषी पद्धतींच्या वैविध्यतेला हातभार लागला.

निधन

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर नानांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांना “नाना हे मुंबईचे अविभाज्य सम्राट होते” अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नाना शंकशेठ यांचा ३१ जुलै १८६५ साली मृत्यू झाला.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment