Current Affairs | चालू घडामोडी | 20 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 20 MAR 2024

1) 20 मार्च दिनविशेष

1.1) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना मंजूर = 20 मार्च 2015

 • तरतूद = 14 लाख व्यक्तींना प्रशिक्षण
 • मंत्रालय = कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय

1.2) जागतिक चिमणी दिवस

 • 2010 पासून

1.3) राष्ट्रीय सामाजिक सबलीकरण दिन

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ या दिवशी झाला होता.
 • त्यामुळे २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) तसेच ‘समता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

1.4) आंतरराष्ट्रीय आनंद दिवस

 • सुरूवात = 2012

2) सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ए एस राजीव यांची दक्षता आयुक्त (VC) म्हणून नियुक्ती केली आहे.

 • प्रवीण कुमार श्रीवास्तव हे मे 2023 पासून केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत, तर अरविंदा कुमार ऑगस्ट 2022 पासून दक्षता आयुक्त आहेत. त्यात आता दुसरे दक्षता आयुक्त म्हणून राजीव यांची नियुक्ती झाली
 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांची नियुक्ती केली
 • केंद्रीय दक्षता आयोग (CVC) ही एक सर्वोच्च भारतीय सरकारी संस्था आहे जी 1964 मध्ये सरकारी भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आली आहे . 2003 मध्ये, संसदेने CVC ला वैधानिक दर्जा देणारा कायदा लागू केला.
 • केंद्रीय दक्षता आयोग कायद्यानुसार, आयोगामध्ये तीन सदस्यांचा समावेश आहे: केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त(VC) (1+2)

3) Human development report (HDR) 2023/24

 • भारत = 134 th /194 देश (0.644)
 • रिपोर्टचे नाव = BREAKING the gridlock : reimagining cooperation a polarized world
 • रिपोर्ट जरी 2023/24 चा असला तरी रँकिंग ही 2022 ची आहे

4) जगातील सर्वाधिक प्रदूषित ” शहरे “

 1. बेगुसराय (भारत)
 2. गुवाहाटी (भारत)
 3. दिल्ली (भारत)
 4. मुल्लनपूर (भारत)
 5. लाहोर (पाकिस्तान)
 • जगातील सर्वाधिक प्रदूषित ” देश ”
  • . बांगलादेश ७९.९
  • पाकिस्तान
  • भारत
  • ताजिकिस्तान
  • बर्किना फासो
 • महाराष्ट्रातील प्रदूषित शहरे
  • भिवंडी
  • पिंपरी चिंचवड
  • नागपूर
  • पुणे
  • नवी मुंबई
  • मुंबई
  • कल्याण
 • स्वित्झर्लंडमधील IQ Air या संस्थेने 2023 या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून अहवाल तयार केला आहे.

5) हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा

 • देशांतर्गत मतभेद चिरडण्यासाठी सरकारला जास्त अधिकार देण्यात आले आहेत.

6) अचूक निर्णयासाठी ‘आयपीएल’मध्ये DRS ऐवजी SRS ही नवी प्रणाली

 • SRS = Smart Replay System
 • DRS = Decision Review System
 • तिसऱ्या पंचाला मिळणार मदत; प्रणालीवर काम करण्यासाठी १५ पंचांची निवड.
 • ही नवी ‘हॉक-आय’ प्रणाली आहे.

7) निवडणुकीचा इतिहास – 1

 • 1967 सालच्या चौथ्या लोकसभा निवडणुका मधे ‘जय जवान जय किसान’ या नाऱ्यावर निवडणुका झाल्या होत्या
 • 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले होते. 1965 मधे पाकिस्तानने युद्ध छेडले होते. या परिस्थितीत देशभरात अन्नधान्याची कमतरता झाली होती.
 • या पार्श्वभूमीवर शेतकरी व सीमेवरील सैनिकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला
 • अशा कठीण प्रसंगी त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी समस्त जनतेला आठवड्यातून एक दिवस उपवास राखण्यास सांगितले होते.
 • UN च्या मध्यस्तीने युद्ध थांबल्यानंतर शास्त्री यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या लोकसभेत काँग्रेस विजयी झाले होते

8) प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्रभा वर्मा यांना त्यांच्या ‘रौद्र सत्विकम’ या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 33 वा सरस्वती सन्मान, 2023 जाहीर

 • 1959 मध्ये केरळमधील तिरुवल्ला येथे जन्मलेल्या वर्मा यांनी मल्याळम आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अनुकरणीय साहित्यकृतींसह द्विभाषिक लेखक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे
 • सरस्वती सन्मान पुरस्कार विषयी
  • हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, ज्याची स्थापना केके बिर्ला फाऊंडेशनने 1991 मध्ये केली होती.
  • हा भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची VIII मध्ये सूचीबद्ध केलेल्या 22 भारतीय भाषांपैकी उत्कृष्ट गद्य किंवा काव्य कृतींसाठी वार्षिक साहित्य पुरस्कार आहे.
  • स्वरूप = ₹15 लाख, एक फलक आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे.
  • गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या साहित्यिक कार्यावर आधारित उमेदवारांची निवड केली जाते.
  • पहिला सरस्वती सन्मान पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना
  • 2022 चा 32 वा पुरस्कार = शिवशंकरी या तमिळ लेखिकेला तिच्या “सूर्य वंश” या संस्मरणीय पुस्तकासाठी
  • 2020 चा 30 वा पुरस्कार = शरण कुमार लिंबाळे (मराठी)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment