Current Affairs | चालू घडामोडी | 12 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 12 MAR 2024

1) 12 मार्च

 • समता दिन
 • यशवंतराव चव्हाण जन्मदिन = 12 मार्च 1913
 • दांडी यात्रेला सुरुवात = 12 मार्च 1930
  • गांधीजींची 78 स्वयंसेवकांसोबत साबरमती आश्रमापासून यात्रेला सुरुवात
  • अंतर 240 मैल

2) ऑस्कर पुरस्कार 2024

 • ओपेनहायमर’ चित्रपटाने जिंकले सात ऑस्कर पुरस्कार
 • संपूर्ण यादी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: किलियन मर्फी = ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्रिस्टोफर नोलन = ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: एम्मा स्टोन = पुअर थिंग्ज
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: दा वाइन जॉय रँडॉल्फ = द होल्डओव्हर्स
  • सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट: वॉर इज ओव्हर!”
  • सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर: द बॉय अँड द हेरॉन
  • सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा = ॲनाटॉमी ऑफ अ फॉल
  • सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा: अमेरिकन फिक्शन
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट: द झोन ऑफ इंटरेस्ट
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: रॉबर्ट डाउनी ज्युनियर = ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन: ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट: माहितीपट : द लास्ट रिपेअर शॉप
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर: 20 डेज इन मरिओपुल
  • सर्वोत्कृष्ट छायांकन/ चित्रपट :- ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह ॲक्शन): द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर
  • सर्वोत्कृष्ट गाणे: “व्हॉट वॉज आय मेड फॉर = बार्ब
 • दिवंगत झालेल्यांना ऑस्कर सोहळ्यात नेहमीच आगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली जाते. यंदा या यादीमध्ये कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचेही नाव आणि छबी झळकली.

3) शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

 • १ मे २०२४ नंतर जन्मलेल्यांसाठी सक्ती
 • शासकीय कागदपत्रांवर उमेदवाराचे नाव त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदविण्याचे बंधनकारक करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

4) एकलव्य कुशल योजना

 • आदिवासींच्या नवीन पिढीच्या कौशल्य विकासाची योजना
 • शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत, अनुसूचित जमातीतील तरुणांसाठीची मोफत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार

5) शालेय प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित

 • पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी किमान तीन वर्षे, तर कमाल चार वर्षे पाच महिने

6) मिशन दिव्यास्त्र या अग्नी 5 मिसाईल ची यशस्वी चाचणी

 • DRDO शास्त्रज्ञांनी मिशन दिव्यस्त्र या नावाने स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची (Agni 5 Nulear Missile) पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे
 • हे सुधारित क्षेपणास्त्र ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिएंट्री वेईकल’ (MIRV) या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.
 • एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे एका क्षेपणास्त्रातून ४ ते १० स्फोटकाग्रे एकापेक्षा अधिक लक्ष्यांवर डागता येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा प्रतिकार करणे अवघड होते, तसेच विध्वंसही विविध ठिकाणी घडवला जाऊ शकतो.
 • अग्नी-५ चा प्रहारपल्ला ५ हजार किलोमीटर इतका आहे. या पल्ल्यात चीनसकट संपूर्ण आशिया, युरोपचा बराचसा भाग आणि आफ्रिकेचा काही भाग येतो.
 • अग्नी-५ हे आंतरखंडीय (इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल – आयसीबीएम) प्रकारातील क्षेपणास्त्र आहे.

7) सीएए कायदा भारतात लागू होणार

 • ‘सीएए’ कायदा काय आहे ?
 • सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा आहे  बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे (मुस्लिम सोडून)👇👇
  • पाकिस्तान,
  • अफगाणिस्तान व
  • बांगलादेशमधून ( हे तीनच देश)
 • 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या –
 1. हिंदू,
 2. शीख,
 3. जैन,
 4. बौद्ध,
 5. पारशी आणि
 6. ख्रिश्चनांसह अन्य पीडित
 7. गैरमुस्लीम
 • स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आला.
 • त्यासाठी 1955 च्या नागरिकत्व कायद्यात बदल केला
 • कायदा अस्तित्वात आला कधी ❓
  • 2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले
  • 9 डिसेंबर 2019 – लोकसभेत मंजूर
  • 11 डिसेंबर 2019 – राज्यसभेत मंजूर
  • 12 डिसेंबर 2019 – राष्ट्रपती ची सही
 • आता तो भारतात लागू होणार आहे
 • नागरिकत्व मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबपोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. अर्जदारांकडून इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही.
 • घटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये आसाममधील कार्बी आंगलाँग, मेघालयातील गारो हिल्स, मिझोराममधील चकमा जिल्हा आणि त्रिपुरातील आदिवासीबहुल भागांना वगळण्यात आले आहे.
 • गेल्या १४ वर्षांपैकी किमान पाच वर्षे वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. आतापर्यंत सलग ११ वर्षे वास्तव्य असलेल्या स्थलांतरितांनाच नैसर्गिकिकरीत्या नागरिकत्व मिळत असे.
 • जिथे ‘इनर लाईन परमिट’ लागू आहे तिथे ‘सीएए’ची अंमलबजावणी होणार नाही
 • मात्र अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर येथे ‘आयएलपी’ लागू आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment