Current Affairs | चालू घडामोडी | 11 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 11 MAR 2024

1) 11 मार्च

 • छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी = 11 मार्च 1689 (तारखेनुसार)
 • आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर बनल्या = 11 मार्च 1886

2) भारताच्या बचाव मोहिमा

 1. ऑपरेशन गंगा = युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी
 2. ऑपरेशन देवी शक्ती = अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी
 3. ऑपरेशन वंदे भारत = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
 4. ऑपरेशन समुद्र सेतू = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
 5. ऑपरेशन कावेरी = सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
 6. ऑपरेशन अजय = इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी
 7. ऑपरेशन राहत = येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले

3) फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडीला जेतेपद

 • फ्रेंच ओपनचे त्यांचे हे दुसरे विजेतेपद आहे

4) ‘गामिनी’ चित्त्याकडून कडून पाच बछड्यांना जन्म

 • आता कुनोत बछड्यांसह चित्त्यांची संख्या आता २६ झाली आहे.
 • यापूर्वी नामिबिया येथून आणलेल्या तीन चित्त्यांनी बछड्यांना जन्म दिला होता.
 • दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याने प्रथमच बछड्यांना जन्म दिला आहे.

5) प्रगती पुस्तकाचे स्वरूप बदलणार

 • परीक्षांतल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची ‘प्रगती’ वा अधोगती ठरवणाऱ्या प्रगती पुस्तकाचे स्वरूप बदलण्याची कल्पना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि परख या यंत्रणांनी मांडली आहे.
 • प्रगती पुस्तकात काय बदल होतील?
  • सध्या वार्षिक परीक्षा किंवा वर्षभर घेण्यात येणाऱ्या लेखी, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, प्रकल्प यांतील गुणांआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. त्यातून शैक्षणिक मूल्यमापन होते. विशिष्ट विषय किंवा संकल्पना किती अवगत आहेत त्याचे मोजमाप होते.
  • मात्र त्यापुढे जाऊन या नव्या प्रारूपात विद्यार्थ्यांची सामाजिक, भावनिक जाण, सर्जनशीलता किती विकसित झाली त्याचाही अदमास घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनाच त्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
  • विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यमापन करायचे आहे. त्यांची बलस्थाने आणि कमकुवत क्षेत्रे त्यांनी नमूद करणे अपेक्षित आहे.

6) ‘नोटा’ = none of the above

 • देशातील निवडणुकांत कोणताही उमेदवार योग्य आहे, असे वाटत नसेल, तर तसे मत बजावण्याचा अधिकार म्हणजेच ‘नोटा’ (वरीलपैकी कोणीही नाही) मतदाराला सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेला आहे.
 • 2013 साली पहिल्यांदा नोटा चा वापर काही राज्यांच्या निवडणुकीत केला गेला.
 • 2014 सालच्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा संपूर्ण देशात केला गेला

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment