Current Affairs | चालू घडामोडी | 10 MAR 2024
1) सावित्रीबाई फुले स्मृतिदिन = 10 मार्च 1897
- जन्मस्थळ = नायगाव (सातारा)
- 1893 = 20 वी सत्यशोधक परिषद अध्यक्षा
- काव्यसंग्रह = काव्यफुले, बावन्नकशी सुबोध रत्नाकर
2) निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
- पंजाब केडरचे सनदी अधिकारी राहिलेले अरुण गोयल यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच दिवशी गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- पंजाब विद्यापीठातून गणितात त्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८५ च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत.
- त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूरही केला. गोयल यांचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी तीन वर्षे (२०२७) शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- दुसरे निवडणूक आयुक्त अनुप पांडे 15 फेब्रुवारी 2024 रोजी निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी नव्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर संपूर्ण आयोगाची जबाबदारी येऊन पडली आहे.
3) जेम्स अँडरसनने 700 कसोटी बळी पूर्ण केले
- 700 बळी घेणारा जेम्स अँडरसन पहिला वेगवान गोलंदाज
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
- 800: मुथय्या मुरलीधरन
- 708: शेन वॉर्न
- 700: जेम्स अँडरसन
- 619: अनिल कुंबळे
- 604: स्टुअर्ट ब्रॉड
4) वाढवण बंदर ‘जेएनपीटी’पेक्षा तिप्पट मोठे
- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर आहे. देशातील ६५ टक्के मालवाहतूक या बंदरातून करण्यात येते.
- पण आता मुंबईजवळ जेएनपीटीच्या तिप्पट मोठे वाढवण बंदर आपण विकसित होत आहे
5) भारताशी आणखी 4 देशांचा मुक्त व्यापार
- आईसलॅंड, लिंकेस्टाईन, नोर्वे, स्वित्झर्लंड या 4 देशांसोबत होणार करार
- चारही देश युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन चे सदस्य
6) सेला बोगदा
- सेला बोगदा अरुणाचल प्रदेश राज्यात आहे.
- सेला बोगदा हा सर्वाधिक उंचीवरील जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे.
- जुळ्या बाेगद्यांपैकी एक बोगदा १,००३ मीटर, तर दुसरा १,५९५ मीटर लांब आहे.
- त्याला ८.६ किमी लांबीचा ॲप्रोच व लिंक रोड आहे.
- संकटाच्या काळात बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र सुटका मार्ग त्यात आहे.
- तो समुद्र सपाटीपासून १३ हजार फूट उंचीवर आहे.
7) ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’
- राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे.
- ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे साठी, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना 3000 रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
- निकष
- उत्पन्न मर्यादा – लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
- निवड / निश्चित केलेल्या जिल्ह्यात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.
8) चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा यंदाची विश्वसुंदरी (मिस वर्ल्ड 2024)
- मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तब्बल 27 वर्षानंतर मिस वर्ल्ड 2024 चे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी 1996 मध्ये ही स्पर्धा भारतातील बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती.
- मिस पहिली रनअप=🥈मिस लेबनॉन*
- आयोजन ठिकाण=मुंबई महाराष्ट्र
- भारतातील आता पर्यंत मिस वर्ल्ड
- मानुषी छिल्लर =2017
- प्रियंका चोप्रा =2000
- युक्ता मुखी =1999
- डायना हेडन=1997
- ऐश्वर्या राय बच्चन=1994
- रिटा फारिया=1966
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel