Current Affairs | चालू घडामोडी | 09 MAR 2024
1) तेलुगु देसम, जनसेना ‘एनडीए’मध्ये सामील
- चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष तर जनसेना हा पवन कल्याण यांचा पक्ष आहे
- तिन्ही पक्षांची युती आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही एकत्रित लढण्याची शक्यता, बिजू जनता दलालाही ‘एनडीए’मध्ये आणण्याचे प्रयत्न
- ‘एनडीए’तील भाजपचे नवे सहकारी
- बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल (सं.),
- जितन मांझी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चा,
- उत्तर प्रदेशमध्ये ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाजपक्ष,
- संजय निषाद यांचा निषाद पक्ष,
- जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल,
- पंजाबमध्ये अकाली दलाशी युती करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे सांगितले जाते.
2) नेपाळमध्ये आता ‘यूपीआय’द्वारे रोखरहित व्यवहार शक्य
- रोखरहित देयक व्यवहारासाठी भारतातील लोकप्रिय प्रणाली ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात यूपीआयचा वापर आता नेपाळमध्ये सुरू झाला आहे
- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल (एनआयपीएल) आणि नेपाळमधील सर्वांत मोठे देयक नेटवर्क ‘फोनपे पेमेंट सर्व्हिस’ यांच्यात 2023 मधील सप्टेंबरमध्ये भागीदारी झाली होती.
3) सुधा मूर्ती यांचे राज्यसभेसाठी नामनिर्देशन
- सुधा मूर्ती या मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना २००६मध्ये पद्माश्री तर २०२३मध्ये पद्माभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel