Current Affairs | चालू घडामोडी | 23 JUN 2024
1) 23 जून
1.1) बंगालचा नवाब सिराज उद्दौला चा पराभव = 23 जून 1757
- प्लासीचे युद्ध = ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध
1.2) श्यामा प्रसाद मुखर्जी पुण्यतिथी
1.3) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) चा स्थापना दिवस (23 जून 1894) ‘ऑलिंपिक दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
- पहिला ऑलिम्पिक दिवस 1948 मध्ये साजरा करण्यात आला.
- थीम:- “Let’s move and celebrate”
2) स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय सात सदस्यीय समितीची घोषणा केली. ‘इस्राो’चे माजी प्रमुख के राधाकृष्णन हे या समितीचे अध्यक्ष असतील.
- पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा घेण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. समितीने दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
- देशभरात ‘नीट-यूजी २०२४’ आणि ‘यूजीसी-नेट’ या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘नॅशलन टेस्टिंग एजन्सी’चे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली.
- ‘एनटीए’च्या प्रमुखपदी पुढील नियुक्ती केली जाईपर्यंत ‘भारत व्यापार प्रसार संघटने’चे (आयटीपीओ) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंह खारोला यांच्याकडे ‘एनटीए’ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
- खारोला हे १९८५च्या तुकडीचे निवृत्त अधिकारी आहेत.
3) भारत बांगलादेश सागरी सहकार्य
- आर्थिक, समुद्री व्यवसाय क्षेत्राशी संबंध वाढवण्याचे प्रयत्न
- दोन्ही देशांमधील प्रमुख करारांमध्ये डिजिटल क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करणे, हरित भागीदारी, रेल्वे वाहतूक आदींचाही समावेश आहे
- सर्वसमावेशक व्यापार करारावर चर्चेस सहमती
- भारत-बांगलादेशने ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारा’वर (सीईपीए) वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविली.
4) कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचा देशातील पहिला प्रयोग
- एक हजार शेतकऱ्यांपर्यंत प्रकल्पाचा विस्तार
- कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.
- बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, आता हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबवला जाणार आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel