Current Affairs | चालू घडामोडी | 25 JUN 2024
1) 25 जून
1.1) प्रधानमंत्री आवास योजना = 25 जून 2015
- लक्ष्य = 2 कोटी घरे बांधणे
1.2) अमृत योजना = 25 जून 2015
- Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation
- देशभरातील 500 शहरांचा विकास करणे
1.3) सुचेता कृपलानी जयंती = 25 जून 1908
- भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री = उत्तर प्रदेश (1963-67)
2) मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना
- योजना काय?
- महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना.
- पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये.
- दारिद्रयरेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, तसेच विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ.
- रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा
- गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ ही योजना आणली.
- त्या निवडणुकीत सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळविले.
- अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मध्य प्रदेशने २९ पैकी २९ जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या.
- या दोन्ही विजयांमागे ‘लाडली बहना योजना’ कळीची ठरल्याचे मानले जाते.
3) सिंधू जल करार : पाक शिष्टमंडळ पाच वर्षांनंतर जम्मूकाश्मीरमध्ये
- भारत-पाकिस्तानच्या पथकाकडून ऊर्जा प्रकल्पांची पाहणी
- १९६० च्या समझोता कराराअंतर्गत पाकिस्तानी शिष्टमंडळाची गेल्या पाच वर्षांत ही पहिलीच जम्मू-काश्मीर भेट ठरली आहे.
- भारत आणि पाकिस्तानने नऊ वर्षांच्या वाटाघाटीनंतर सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. जागतिक बँकेनेही या करारावर स्वाक्षरी केली असून, याअंतर्गत नद्यांच्या पाण्याच्या वापरावर दोन्ही बाजूंचे सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे
4) राज्यसभा नेते = भाजपा नेते जे पी नड्डा
5) दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्यांदा सिरील रामफोन्सा अध्यक्ष
6) ढगांवर तरंगणारे कोकणातील सर्वात सुंदर गाव! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घोषीत केले थंड हवेचे पहिले गाव माचाळ
- ते रत्नागिरी जिल्हा मध्ये येत असून त्या गावची लोकसंख्या 350 ते 400 इतकीच आहे
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel