Current Affairs | चालू घडामोडी | 26 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 26 JUN 2024

1) छत्रपती शाहू महाराज जयंती = 26 जून 1874

  • वेदोक्त प्रकरण = 1899
  • 23 वसतिगृहांची स्थापना
  • मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा निर्णय = 1917
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण = 1902

2) NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन

  • इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन हे या समितीचे अध्यक्ष असतील
  • ही समिती मंत्रालयाला परीक्षा प्रक्रिया यंत्रणेतील सुधारणा, माहिती साठ्याच्या नियमाधारीत व्यवस्थेतील सुधारणा आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना, तसंच कार्यपद्धतीबद्दल शिफारसी सादर करेल.

3) भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन !

  • राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जुन 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला.
  • शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.
  • कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी पुरस्कार’ रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात दिला जातो.

4) 64 व्या आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO) परिषद बैठकीचे यजमानपद यंदा भारताकडे

  • साखर क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था परिषद बैठक या जागतिक पातळीवरील कार्यक्रमाचे यजमानपद यंदा भारताकडे आहे.
  • दिनांक : 25 ते 27 जून 2024
  • ठिकाण : नवी दिल्ली
  • या कार्यक्रमात साखर आणि जैवइंधन क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत
  • भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

5) युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले ‘साहित्य शहर’ : कोझिकोड

  • 23 जून 2024 रोजी कोझिकोडने भारतातील पहिले UNESCO साहित्य शहर बनून इतिहास रचला.
  • ही प्रतिष्ठित ओळख शहराचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते.
  • महापौर एम. बीना फिलिप यांनी घोषणा केली की 23 जून हा दिवस “साहित्य शहर” म्हणून साजरा केला जाईल.
  • UNESCO संचालक : ऑड्रे अझौले
  • युनेस्कोची स्थापना: 16 नोव्हेंबर 1945
  • युनेस्को मुख्यालयः पॅरिस, फ्रान्स

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment