Current Affairs | चालू घडामोडी | 04 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 04 JULY 2024

1) 4 जुलै

1.1) पिंगली व्यंकय्या पुण्यतिथी = 4 जुलै 1963

  • राष्ट्रध्वजाच्या रचनेचे निर्माते

1.2) स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

2) भारत मंगोलिया संयुक्त युद्ध सराव : ‘नोमॅडिक एलिफंट’

  • दिनांक : 3 ते 16 जुलै 2024
  • यंदाची आवृत्ती : 16 वी
  • ठिकाण : मेघालयातील, उमरोई
  • भारताच्या 45 जणांच्या पथकाचे प्रतिनिधित्व सिक्कीम स्काऊट्स ची एका बटालियन तसेच अन्य शाखा आणि सेवा दलातील जवान करत आहेत.
  • मंगोलियाच्या पथकाचे प्रतिनिधित्व मंगोलियन लष्कराच्या 150 क्विक रिअक्शन फोर्स बटालियन चे जवान करत आहेत.
  • या युद्धसरावात दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर, संयुक्त कमांड पोस्ट उभारणी, गुप्तसूचना व टेहळणी केंद्राची उभारणी, विशेष हेलिकॉप्टर मोहीमा, इत्यादी अनेक गोष्टीचा समावेश आहे.

3) डॉ. बी.एन. गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या कावा अध्यक्षपदी नियुक्ती

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि स्वायत्त मंडळांच्या पदांवर विविध व्यक्तींची नियुक्ती केली आहे.
  • या नियुक्त्या 4 वर्षांच्या कालावधीसाठी असून, नियोक्ता 70 वर्षांचा होईपर्यंत, अथवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे लवकर असेल, तोपर्यंत लागू राहील.

4) भारत – थायलंड यांच्यातील संयुक्त लष्करी सराव : मैत्री

  • दिनांक : 1 ते 15 जुलै 2024
  • ठिकाण : थायलंडच्या टाक प्रांतात
  • यंदाचे : 13 वे सराव
  • भारत आणि थायलंड यांच्यात लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्याचे मैत्री या संयुक्त सरावाचे उद्दिष्ट आहे.
  • या सरावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत जंगल आणि शहरी पर्यावरणातील घुसखोरी / दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराची क्षमतावृद्धी होईल.

5) नीट परीक्षेबाबत विरोधकांनी दिशाभूल करू नये!

  • देशातील विरोधी पक्ष ‘नीट-यूजी’ परीक्षेबाबत खोटी माहिती पसरवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांनी आपले हे ह्यफसवणूक धोरणह्ण थांबवावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
  • तमिळनाडू सरकारने ‘नीट’ परीक्षेला तीव्र विरोध केला असून विधानसभेत या विरोधातील ठराव बहुमताने मंजूरही केला. 
  • या ठरावाला ‘तमिझगा वेत्री कळघम’चे (टीव्हीके) संस्थापक आणि प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय यांनी पाठिंबा दिला आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment