Current Affairs | चालू घडामोडी | 08 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 08 JULY 2024

1) 8 जुलै

1.1) माँटेग्यू चेम्सफर्ड अहवाल प्रकाशित = 8 जुलै 1918

  • तरतूद = द्विगृही कायदेमंडळ (केंद्रात)
  • लोकसेवा आयोग स्थापना
  • प्रांतात द्विदल राज्यपद्धती (Dyarchy)

2) अविनाश साबळेने नवीन राष्ट्रीय विक्रम रचला.

  • अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम रचला.
  • अविनाशने प्रतिष्ठित पॅरिस डायमंड लीगमध्ये ८.०९.९१ सेकंद वेळ देत सहाव्या स्थानी शर्यत पूर्ण केली.
  • त्याने स्वतःचा ८.११.२० वेळेचा विक्रम मोडला.

3) सर्वात कमी डावात T – 20 मध्ये शतक करणारा अभिषेक शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • अभिषेक शर्माने दुसऱ्याच सामन्यात शतक केलं आहे.
  • याआधी दीपक हुड्डा याच्या नावावर हा विक्रम होता. हुड्डाने 3 सामन्यात शतक केलं होतं.
  • झिम्बाब्वे मध्ये T – 20 आंतरराष्ट्रीय शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी एकाही भारताच्या खेळाडूल ही कामगिरी करता आलेली नव्हती

4) भारतीय वंशाच्या लिसा नंदी ब्रिटनच्या मंत्री बनल्या

  • 5 जुलै रोजी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान केयर स्टारमर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. 
  • पी. एम. स्टारमर यांनी भारतीय वंशाच्या खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केली.
  • लिसा नंदी 5व्यांदा लेबर पार्टीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
  • नंदी वयाच्या 30 व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या
  • बंगालमध्ये जन्मलेल्या लिसाचे वडील दीपक नंदी हे शिक्षणतज्ज्ञ होते.
  • सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने 650 पैकी 412 जागा जिंकल्या.
  • माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ १२१ जागा मिळाल्या.

5) महाराष्ट्र राज्याच्या नव्या पर्यटन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

  • महत्वाच्या तरतुदी
    1. पर्यटन पूरक व्यवसायांना उद्योगाचा दर्जा दिला जाणार
    2. महत्त्वाचे रिसॉर्ट खासगी तत्त्वावर 10 ते 90 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली जाणार
    3. सिंधुदुर्ग येथे स्कुबा डायव्हिंग केंद्र

6) रॅचेल रीव्स ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत.

  • बँक ऑफ इंग्लंडच्या माजी अर्थतज्ज्ञ रॅचेल रीव्हस यांची 14 वर्षांची कंझर्व्हेटिव्ह राजवट संपवून लेबरच्या प्रचंड विजयानंतर यूकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • युनायटेड किंगडम हे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांनी बनलेले आहे.
  • सम्राट: चार्ल्स तिसरा.
  • यूके अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, इंग्रजी वाहिनी, सेल्टिक समुद्र, आयरिश समुद्र यांनी वेढलेले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment