Current Affairs | चालू घडामोडी | 02 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 02 AUG 2024

1) 2 ऑगस्ट दिनविशेष

  • 2 ऑगस्ट 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
  • 2 ऑगस्ट 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
  • 2 ऑगस्ट 1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.

2) भारताचे क्रिकेटपटू माजी अंशुमन गायकवाड यांचे निधन

  • 40 कसोटी व 15 वन डे सामने त्यांनी खेळले.
  • भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पण होते (2000)
  • त्यांच्यावर लंडनमधील किंग्ज कॉलेज मध्ये उपचार सुरू होते
  • बीसीसीआयने उपचारासाठी 1 कोटी रुपये दिले होत.

3) जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा वाटा तब्बल ४८.५ टक्के इतका आहे.

  • डिजिटल व्यवहारांमध्ये भारत जगात सर्वात आघाडीवर आहे

4) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर SC कोटा उप-वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा ‘पहिले राज्य’ असेल

5) पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य

  • पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते.
  • मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे.
  • आता ‘महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो), I ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे घोषवाक्य (टॅग लाईन) असेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

6) सुप्रीम कोर्टाची 75 वर्षे : 75 रुपयांचे विशेष नाणे

  • सर्वोच्च न्यायालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार आहे.
  • या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाची इमारत राहणार आहे.
  • 75 रुपयांचे हे 11वे नाणे आहे. नाणे कोलकाता येथील कारखान्यात बनविण्यात आले आहे.
  • यापूर्वी वर्ष 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त 50 आणि दोन रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते.
  • कसे असेल नाणे?
    • नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले आहे, अशोक स्तंभाच्या एका बाजूला ‘भारत’, तर दुसऱ्या बाजूला ‘इंडिया’ लिहिलेले आहे.
    • दुसऱ्या बाजुला अशोक चक्र कोरण्यात आलेले आहे. त्यासोबतच 75 वर्षे, ‘यतो धर्मस्ततो जयः आणि 2024 हे वर्षदेखील लिहिलेले आहे.
  • वजन : 40 ग्रॅम
  • चांदी :99.9 टक्के
  • व्यास : 44 मिमी

7) जागतिक वारसा समितीची ऐतिहासिक बैठक भारतात

  • दिनांक : 21 ते 31 जुलै 2024
  • ठिकाण : दिल्ली, भारत मंडपम
  • यंदाचे : 46 वे
  • उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते
  • सुरुवात : 1977
  • भारताने प्रथमच जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे आयोजन केले.

8) मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास

  • भारताच्या स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
  • त्याचा एकूण स्कोर 451.4 होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे आहेत.
  • पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.
    1. मनु भाकर
    2. सरबजोत सिंग
    3. स्वप्नील कुसळे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment