Current Affairs | चालू घडामोडी | 03 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 03 AUG 2024

1) 3 ऑगस्ट दिनविशेष

  • क्रांतिसिंह नाना पाटील जयंती = 3 ऑगस्ट 1900
    • सातारा येथील प्रतिसरकारचे संस्थापक
    • बीड जिल्ह्याचे माजी खासदार

2) साताऱ्यातील मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम

  • राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध योजना यशस्वीपणे राबवणारे पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
  • सध्या गावातील प्रत्येक घरावर सौरऊर्जानिर्मितीची यंत्रणा बसवली जात असून, येत्या 10 ऑगस्ट पूर्वी हे काम पूर्ण होणार आहे.
  • राज्य व केंद्र शासनाकडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन असल्याची संधी घेण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक मिळकतदाराने ‘ऑनग्रीड सौरऊर्जानिर्मिती’ची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली.

3) 16 वर्षीय जिया रायु हिने केली इंग्लिश खाडी पार

  • जिया राय या स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) असलेल्या 16 वर्षीय मुलीने इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहून पार केली आहे.
  • ही कामगिरी करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वांत वेगवान पॅरा-जलतरणपटू बनली आहे.
  • भारतीय नौदलातील एमसी-एट-आर्म्स खख, मदन राय यांची मुलगी, जिया हिने 17 तास 25 मिनिटांत 34 किलोमीटरचे अंतर कापून ही कामगिरी केली.
  • विशेष उल्लेखनीय म्हणजे, इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्यांमध्ये जिया ही ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेली पहिली मुलगी आहे.
  • जियाने आपली ही मोहीम ऑटिझम जागरूकतेसाठी समर्पित केली आहे.

4) 54 वे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2024

  • दिनांक : 21  ते 29 जुलै 2024
  • ठिकाण : ईरान, इस्फ़हान
  • सर्व 5 भारतीय सहभागींनी 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके मिळवून पदके जिंकली.
  • या स्पर्धेत 43 देशांतील एकूण 193 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
  • इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड (IPHO) ही हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक चॅम्पियनशिप भौतिकशास्त्र स्पर्धा आहे आणि ती दरवर्षी वेगळ्या देशात आयोजित केली जाते. 
  • पहिला IPHO 1967 मध्ये पोलंडमध्ये आयोजित करण्यात आला होता.

5) रोहन बोपण्णा 22 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्त

  •  पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत  झालेल्या पराभवानंतर भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली.
  • 44 वर्षांचा बोपण्णा 22 वर्षे भारताकडून खेळत होता. त्याने 2002 मध्ये देशासाठी पदार्पण केले होते.
  • झालेल्या सामन्यात गेल मॉन्फिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन या फ्रेंच जोडीने 5-7, 6-2 ने पराभूत केले.
  • यासह त्यांना भारतीय जोडी स्पर्धेतून बाहेर पडली.
  • बोपण्णाने कारकिर्दीत 6 ग्रैंडस्लॅम पुरुष दुहेरी सामन्यांमध्ये अंतिम फेरीत गाठली आहे. 2017 मध्ये मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन आणि 2024 मध्ये पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याची किमयाही त्याने करून दाखविली होती.

6) 14 वर्षीय जयसिंगने उंचावली भारताची मान

  • आंतरराष्ट्रीय घोडेस्वारीत पटकावलं रौप्यपदक
  • कालावधी: 25 ते 28 जुलै 2024
  • ठिकाण : बेल्जियममध्ये
  • युरोप मधील बेल्जियम येथे नुकत्याच पार पडलेल्या घोडेस्वारीच्या शर्यतीत भारत च्या 14 वर्षांच्या मुलाने कमाल केली.
  • जय सिंग सभरवाल हा भारताचा एक उदयोन्मुख घोडेस्वार आहे.
  • CSI 1 1.20m आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत च्या जय सिंग सभरवाल याने दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले.
  • या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 40 देशांमधून एकूण 63 घोडेस्वारांनी सहभाग घेतला होता. या 63 घोडेस्वारांमध्ये भारताच्या जय सिंग सभरवाल याने दुसरा क्रमांक मिळवत भारताची मान उंचावली.

7) लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या ‘महासंचालक’ म्हणून पदभार स्वीकारणार

  • या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत.
  • यापूर्वी, एअर मार्शल पदावर पदोन्नती झाल्यानंतर हॉस्पिटल  सर्व्हिसेसच्या (सशस्त्र दल) महासंचालक पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
  • वेस्टर्न एअर कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य वैद्यकीय अधिकारी होत्या.
  • याशिवाय, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांना विशिष्ट सेवा पदकही मिळालं आहे. 

8) सुप्रीम कोर्टाची 75 वर्षे : 75 रुपयांचे विशेष नाणे

  • सर्वोच्च न्यायालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार आहे.
  • या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाची इमारत राहणार आहे.
  • 75 रुपयांचे हे 11वे नाणे आहे. नाणे कोलकाता येथील कारखान्यात बनविण्यात आले आहे.
  • यापूर्वी वर्ष 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त 50 आणि दोन रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते.
  • कसे असेल नाणे?
  • नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले आहे, अशोक स्तंभाच्या एका बाजूला ‘भारत’, तर दुसऱ्या बाजूला ‘इंडिया’ लिहिलेले आहे.
  • दुसऱ्या बाजुला अशोक चक्र कोरण्यात आलेले आहे. त्यासोबतच 75 वर्षे, ‘यतो धर्मस्ततो जयः आणि 2024 हे वर्षदेखील लिहिलेले आहे.

9) जागतिक वारसा समितीची ऐतिहासिक बैठक भारतात

  • दिनांक : 21 ते 31 जुलै 2024
  • ठिकाण : दिल्ली, भारत मंडपम
  • यंदाचे : 46 वे
  • उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते
  • सुरुवात : 1977
  • भारताने प्रथमच जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे आयोजन केले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment