Current Affairs | चालू घडामोडी | 14 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 14 AUG 2024

1) 14 ऑगस्ट दिनविशेष

1.1) 14 ऑगस्ट 1991 = नरसिंहन समिती 1 ची स्थापना

  • उद्देश = वित्तीय क्षेत्रात सुधारणा

2) गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर.

  • राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे.
  • अनुराधा पौडवाल यांचे खरे नाव : अलका नाडकर्णी
  • त्यांना या पूर्वी मिळालेले पुरस्कार : पद्मश्री, फिल्म फेअर अवॉर्ड

3) जागतिक हत्ती दिन : 12 ऑगस्ट

  • दरवर्षी, जगभरात हत्तींच्या संवर्धनातील आव्हाने आणि त्यांच्या संरक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन पाळला जातो.
  • हत्तींना पृथ्वीवरील सर्वात मैत्रीपूर्ण प्राण्यांपैकी एक मानले जाते आणि ते पर्यावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • सुरुवात : 2012
  • थीम 2024 : “प्रागैतिहासिक सौंदर्य, धर्मशास्त्रीय प्रासंगिकता आणि पर्यावरणीय महत्त्व व्यक्तिमत्व करणे,
  • जगात सर्वाधिक आशियाई हत्ती भारतात आहेत.
  • देशात हत्तींची सर्वाधिक संख्या कर्नाटकात आहे.
  • प्रोजेक्ट – एलिफेंट : 1992

4) भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार

  • शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा 2024 च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर- टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

5) राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2024 ची घोषणा

  • राज्य सांस्कृतिक पुरस्कारां मध्ये एकूण 12 वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे.
    1. नाटक विभागासाठी 2024 चा पुरस्कार : श्रीमती विशाखा सुभेदार
    2. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2024 चा पुरस्कार : डॉ. विकास कशाळकर
    3. कंठसंगीत प्रकारातील 2024 चा पुरस्कार : सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे.
    4. लोककला क्षेत्रातील 2024 चा पुरस्कारः अभिमन्यू धर्माजी सावदेकर
    5. शाहीरी क्षेत्रातील 2024 चा पुरस्कारः शाहिर राजेंद्र कांबळे
    6. नृत्य वर्गवारीतील 2024 : श्रीमती सोनिया परचुरे
    7. चित्रपट क्षेत्रासाठी 2024 चा पुरस्कारः श्रीमती रोहिणी हटंगडी
    8. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार : संजयनाना धोंडगे
    9. वाद्यसंगीत क्षेत्रातील 2024 साठी: पांडुरंग मुखडे
    10. कलादान या प्रकारात 2024 साठी: नागेश सुर्वे (ऋषीराज)
    11. तमाशा वर्गवारीतील 2024 चा राज्य सांस्कृतिक पुरस्कारः कैलास मारुती सावंत
    12. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये 2024 साठी शिवराम शंकर धुटे

6) आंतरराष्ट्रीय लेफ्ट-हँडर्स डे : 13 ऑगस्ट

  • लेफ्ट-हँडर्स क्लबचे संस्थापक डीन आर. कॅम्पबेल यांनी या दिवसाची सुरुवात केली होती (1976).
  • आंतरराष्ट्रीय डाव्या हातांचा दिवस, दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो,
  • हा एक जागतिक उत्सव आहे जो डाव्या हाताच्या व्यक्तींच्या विविध कौशल्ये, प्रतिभा आणि दृष्टीकोन ओळखतो आणि त्यांचे कौतुक करतो.

7) शिवरायांची प्रतिमा असणारा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा नवीन लोगो

8) बांगलादेश पाठोपाठ आणखी एक सत्तापालट

  • थायलंडमधील न्यायालयाने बुधवारी (14 ऑगस्ट, 2024) पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल पदावरून काढून टाकले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment