Current Affairs | चालू घडामोडी | 28 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 28 AUG 2024

अनुक्रमणिका

1) जय शहा यांची आयसीसीच्या प्रमुख पदी निवड

  • ICC चे ते सर्वात तरुण अध्यक्ष असतील – (वय = 36 वर्ष)🔥
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • जय शहा 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
  • सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने आता नव्या अध्यक्षांची निवड झाली आहे.
  • आयसीसीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो.
  • रोहन जेटली घेणार जय शाहांची बीसीसीआय सचिवपदी जागा !
  • रोहन जेटली हे अरुण जेटली यांचे पुत्र आहेत..

2) लडाख मध्ये नवीन पाच जिल्हे बनवण्याची घोषणा

  • जम्मू-काश्मीरमधून वेगळे झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये केंद्र सरकारने नवीन पाच जिल्हे बनवण्याची घोषणा केली आहे.
  • विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन समोर नेताना, गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन दिली आहे.
  • लडाखमध्ये नवीन पाच जिल्हे
    1. झान्स्कर
    2. द्रास
    3. शाम
    4. नुब्रा
    5. चांगथांग
  • आधीचे जिल्हे :-
    1. लेह
    2. कारगिल
  • एकूण जिल्ह्यांची संख्या आता सात झाली आहे.

3) मनरेगा, 2005 अंतर्गत अकुशल मॅन्युअल कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2024-2025 साठी नवीन वेतन दर

  • सर्वाधिक – हरियाणा – 374₹
  • महाराष्ट्र – 297 ₹

4) महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

  • केंद्र सरकारची एकिकृत निवृत्तीवेतन योजना महाराष्ट्रात लागू
    • राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची सुधारित एकिकृत पेन्शन योजना (युपीएस) लागू
    • यासाठीच्या खर्चाला सुद्धा मंजुरी
    • अंतिम वेतनाच्या 50% + महागाई भत्ता इतकी पेन्शन
    • निवृत्तीवेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्तीवेतन+महागाई भत्ता

    5) कर्मचाऱ्यांना आता पगाराच्या 50% पेन्शन

    • केंद्राकडून एकीकृत निवृत्तिवेतन योजनेला (UNIFIED PENSION SCHEME= UPS) मंजुरी
    • योजना काय ?
    • खात्रीशीर निवृत्ती वेतन:
    • किमान २५ वर्षे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ; निवृत्तीपूर्व अंतिम १२ महिन्यांतील सरासरी मूळ वेतनाच्या निम्मे म्हणजे ५० टक्के इतके दरमहा निवृत्तिवेतन
    • खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तिवेतन :
    • कर्मचाऱ्याने मृत्युपूर्वी मिळविलेल्या निवृत्तिवेतन रकमेच्या ६० टक्के रक्कम कुटुंबाला
    • खात्रीशीर किमान निवृत्तिवेतनः
    • किमान १० वर्षे सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यालाही यातून मासिक १० हजार रुपये निवृत्तिवेतन

    6) ‘रुमी’चे प्रक्षेपण यशस्वी, ३ क्यूब, ५० पिको उपग्रहासह अवकाशात घेतली भरारी

    • पुन्हा वापरता येणार हे रॉकेट
    • भारताने पुनर्वापर करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट रूमी- १ चे शनिवारी प्रक्षेपण केले.
    • रूमी-२००४ या मोहिमेच्या अंतर्गत स्पेस झोन इंडिया या स्टार्ट अप कंपनीने विकसित केलेले हे रॉकेट ३ क्यूब उपग्रह व ५० पिको उपग्रह घेऊन अवकाशात झेपावले.
    • जागतिक तापमान व हवामान बदल यांचा या उपग्रहांद्वारे अभ्यास करण्यात येणार आहे.
    • चेन्नईजवळील तिरुविदंताई येथून रूमी-१ रॉकेट शनिवारी सकाळी ७:२५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले.
    • ‘अवकाश मोहिमांवर खर्च होणार कमी’
    • पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटमुळे अवकाश मोहिमांचा खर्च कमी होणार आहे असा दावा हे रॉकेट बनविणाऱ्या स्पेस झोन इंडिया या कंपनीने केला आहे. भारत अवकाश संशोधन क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे.

    7) अभिनेता विजयकडून पक्षाचा झेंडा सादर

    • तमिळनाडूत दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता विजय दलपती सक्रिय झाला असून, त्याने आपल्या तमिळगा वेतरी कळघम या पक्षाचा झेंडा सादर केला.
    • येथील पनैयूर भागात असलेल्या पक्ष कार्यालयात हा ध्वज विजयच्या हस्ते फडकवण्यात आला.

    8) संसदेच्या लोकलेखा समितीवर (Public Account Committee = PAC) के सी वेणुगोपाल यांची निवड

    • संसदेच्या अतिशय प्रतिष्ठित अशा लोकलेखा समितीच्या (पीएसी) अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती केली आहे.
    • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी २०२४-२५ या वर्षासाठी पाच नवीन संसदीय समित्यांची स्थापना केली.
    • ‘पीएसी’चे नेतृत्व प्रमुख विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेत्यांकडे असावे अशी संसदीय परंपरा आहे.
    • लोकलेखा समितीवर महाराष्ट्रातून राज्यसभेतील अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश भाजप श्रेष्ठींनी केला आहे.
    • संसदीय संकेतानुसार या समितीत लोकसभेतून १५, तर राज्यसभेतील ७ खासदारांचा समावेश करण्यात आला आहे.

    9) कर्जाच्या सुलभ प्रवाहासाठी आता ‘युनिफाईड लेंडिंग इंटरफेस = यूएलआय’ प्रणाली

    • ‘यूपीआय’च्या धर्तीवर रिझर्व्ह बँकेकडून नवीन कर्ज मंच
    • छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना सुलभपणे पत-प्रवाह सुलभ आणि सुकर करणाऱ्या ‘युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (यूएलआय)’ हा तंत्रज्ञानाधारित मंच लवकरच सादर केला जाईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.
    • युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’मुळे संपूर्ण देयक परिसंस्थेचे रूप पालटले. किरकोळ आर्थिक आदान-प्रदानाच्या या डिजिटल रूपाच्या वाढत्या वापरामुळे ते उत्तरोत्तर लोकप्रिय ठरत असल्याचेही दिसून आले.
    • आता ‘यूएलआय’ देखील भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा प्रवासात क्रांतिकारी पाऊल ठरेल. ज्यामुळे विविध क्षेत्रातील, विशेषत: कृषी, लघुउद्याोग आणि छोट्या कंपन्यांच्या मोठ्या प्रमाणात अपूर्ण राहणाऱ्या कर्ज मागणीची पूर्तता होईल
    • प्रस्तावित यूएलआय मंच एकापेक्षा अधिक विदा स्राोतांतून, अगदी विविध राज्यांतील जमिनीच्या नोंदीसह मिळविलेल्या डिजिटल माहितीचा अखंड आणि संमती-आधारित प्रवाह कर्जप्रदात्यांसाठी सुलभ करेल.

    10) काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

    • २००२ मध्ये ते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवडून गेले.
    • २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले.
    • २०१४ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
    • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवित ते प्रथमच खासदार झाले होते.

    Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
    MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
    Telegram Channel || WhatsApp Channel

    TelegramWhatsAppCopy LinkShare

    Leave a Comment