Current Affairs | चालू घडामोडी | 24 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 24 SEPT 2024

1) 24 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 24 सप्टेंबर 1873 = सत्यशोधक समाजाची स्थापना

  • स्थळ = पुणे

1.2) 24 सप्टेंबर 1932 = पुणे करार

  • नेते = गांधीजी आणि डॉ. आंबेडकर

2) राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर

  • सहस्रबुद्धे समिती
  • राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 चे पुनर्विलोकन करण्यासाठी 2022 मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली
  • या समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे होते. त्यांनीच हे धोरण तयार केले आहे.

3) ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पदाची निर्मिती

  • ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ हे पद निर्माण करण्यात आले

4) चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हाच!

  • कोणतीही ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ सामग्री इतरांबरोबर सामायिक न करता केवळ स्वत:जवळ बाळगली तरीही तो ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा’ (पोक्सो) आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’च्या तरतुदीअंतर्गत गुन्हा असल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.
  • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठाने ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ ऐवजी ‘बाल लैंगिक शोषक आणि गैरवर्तन सामग्री’ (सीएसईएएम) असा शब्दप्रयोग वापरण्याचीही सूचना केली.

5) सुधारित निवृत्तिवेतन योजनेबाबत भविष्यात कोणतेही बदल नाही. राज्य शासनाची स्पष्ट भूमिका

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता १ मार्च २०२४ पासून सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू केली जाईल.
    • कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित निवृत्तिवेतन योजना किंवा केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तिवेतन योजना यापैकी एक पर्याय निवडता येईल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन योजनेसाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यालय प्रमुख वा विभाग प्रमुखांकडे पर्याय सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
    • सुधारित निवृत्तिवेतन योजनेचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत बदल करता येईल. त्यानंतर मात्र बदल करता येणार नाही.
    • केंद्राची एकीकृत व राज्याची सुधारित निवृत्तिवेतन योजना यापैकी कोणताच पर्याय स्वीकारणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत लाभ मिळण्याचे कायम राहील
  • लाभ कोणाला?
    •  राज्य शासनाच्या योजनेत २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम निवृत्तिवेतन म्हणून देण्यात येईल.
    •  २० वर्षांपेक्षा कमी वा १० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील.
    •  दहा वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास ७५०० रुपये निवृत्तिवेतन मिळेल. १० वर्षांपेक्षा कमी सेवा झाल्यास निवृत्तिवेतनाला पात्र ठरणार नाहीत.
    •  केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेत किमान २५ वर्षे सेवेची अट आहे. तसेच १० वर्षे सेवा झाली असल्यास १० हजार रुपये निवृत्तिवेतन मिळू शकेल.

6) स्वच्छ भारत मिशन

  • सुरुवात = 2 ऑक्टोबर 2014 रोजी
  • 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (SBM) सुरू करण्यात आले.
  • मिशनचे उद्दिष्ट = उघड्यावर शौचास जाण्यास प्रतिबंध, हाताने मैला साफ करण्याची प्रथा बंद करणे आणि वैज्ञानिक घनकचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हे होते
  • दर्जा आणि त्याचे अर्थ
    • ODF = एकही व्यक्ती उघड्यावर शौचास बसलेली आढळली नाही
    • ODF+ = कोणीही उघड्यावर शौचास बसत नाही आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे व्यवस्थित असतील
    • ODF++ = ODF+ मधील सर्व तरतुदी आणि शौचालयांमध्ये गाळ आणि सेप्टेज व्यवस्थापन असेल
    • WATER+ = दूषित पाणी सोडण्यापूर्वी सर्व सांडपाण्यावर CPCB मानदंडांनुसार प्रक्रिया केली जात असेल
  • अमृत अभियान (2015) = शहरी भागात मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी 500 शहरांमध्ये अमृतचा शुभारंभ
  • स्वच्छ भारत मिशन 2.0 आणि अमृत 2.0 (2021): 100% कचरामुक्त शहरे बनवण्यासाठी आणि 100% पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 आणि AMRUT 2.0 सुरुवात

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment