Current Affairs | चालू घडामोडी | 15 JULY 2025
1) 15 जुलै दिनविशेष
1.1) जागतिक युवा कौशल्य दिन
- आयोजक – संयुक्त राष्ट्र
1.2) 2015 = PMKVY (प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना)
- ही योजना तरुणांना विविध व्यावसायिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
1.3) 2015 = कौशल्य भारत (स्किल इंडिया )
- 2022 पर्यंत 40 कोटींहून अधिक लोकांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
1.3) 2015 = राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण, 2015
- यापूर्वीचे धोरण = 2009
- या धोरणाने देशातील सर्व कौशल्य विकास उपक्रमांना एक व्यापक चौकट दिली आहे
2) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)
- प्रारंभ – 15 जुलै 2015 (जागतिक युवक कौशल्य दिवस)
- उद्दिष्ट –
- देशातील तरुणांना उद्योगानुसार आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे.
- महत्वाची वैशिष्ट्ये:
- मोफत कौशल्य प्रशिक्षण – सरकारमान्य प्रशिक्षण संस्थांमार्फत
- प्रमाणपत्र आणि आर्थिक प्रोत्साहन – प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र व काही रक्कम दिली जाते
- प्लेसमेंट मदत – प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी सहाय्य
- RPL – Recognition of Prior Learning अंतर्गत अप्रशिक्षित मजुरांना त्यांच्या अनुभवावर आधारित प्रमाणपत्र
- कार्यान्वयन संस्था:
- राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)
- कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE)
- परिणाम (2023 पर्यंत):
- 1 कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण
- 700+ प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षण कोर्सेस
- सर्व राज्यांमध्ये प्रशिक्षण केंद्रे

3) विम्बल्डन 2025 – इगा स्विएटेकचा ऐतिहासिक विजय
- पोलंडच्या इगा स्विएटेकने विम्बल्डन 2025 महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हावर 6-0, 6-0 असा अभूतपूर्व विजय मिळवला.
- ओपन युगात विम्बल्डनमध्ये पहिलाच दुहेरी विजय (Double Bagel – 6-0, 6-0) असून 1911 नंतर पहिल्यांदाच हे घडले.
- या विजयानंतर स्विएटेकचे 6वे ग्रँडस्लॅम विजेतेपद निश्चित झाले.
- अनिसिमोव्हा ही 23 वर्षांची नवोदित खेळाडू, ग्रँडस्लॅमच्या पहिल्याच अंतिम फेरीत पोहोचली होती. उपांत्य फेरीत तिने अव्वल मानांकित आर्यना सबलेंकाला पराभूत केले होते.
- याआधी अशा प्रकारचा दुहेरी विजय 1988 फ्रेंच ओपनमध्ये स्टेफी ग्राफने मिळवला होता (विरुद्ध नताशा झ्वेरेव्हा).

4) टेनिसच्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा
- ऑस्ट्रेलियन ओपन : जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे हार्ड कोर्टवर आयोजित करण्यात येते
- फ्रेंच ओपन (रोलँड गॅरोस): मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला पॅरिस, फ्रान्स येथे क्ले कोर्टवर आयोजित केली जाते.
- विम्बल्डन : जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला इंग्लंडमधील लंडन येथे ग्रास कोर्टवर आयोजित केले जाते.
- यूएस ओपन : ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हार्ड कोर्टवर आयोजित करण्यात आली होती.
- एकाच वर्षात या चारही स्पर्धा सलग जिंकणे हे कॅलेंडर ग्रँडस्लॅम मानले जाते.

5) जॅनिक सिनर ला विम्बल्डन पुरुष एकेरी जेतेपद
- जॅनिक सिनर ने कार्लोस अल्काराजचा ४-६, ६-४, ६-४, ६-४ असा पराभव करून विम्बल्डन जिंकले.
- १४८ वर्षांच्या इतिहासात विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावणारा सिन्नर हा पहिला इटालियन खेळाडू आहे.
- अल्काराजला कारकिर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel