Current Affairs | चालू घडामोडी | 19 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 19 JULY 2025

1) 19 जुलै दिनविशेष

1.1) १९६९ = १४ बँकांचे राष्ट्रीयकरण

  • ५० कोटी पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँक
  • तत्कालीन पंतप्रधान = इंदिरा गांधी

1.2) १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

1.3) १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

2) आर .हरिकृष्णन हा भारताचा 87 वा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर झाला 

  • हरिकृष्णन यांनी सात वर्षांच्या प्रयत्नानंतर भारताचा 87 वा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला आहे. 
  • वय: 23 वर्षे
  • मूळ गाव: चेन्नई, तमिळनाडू
  • टायटल मिळवण्याची तारीख: 11 जुलै 2025
  • स्पर्धा: ला प्लॅग्न इंटरनॅशनल चेस फेस्टिव्हल, फ्रान्स
  • गुण अंतिम फेरीत 5.5/9 गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले
  • अंतिम फेरीत भारतीय ग्रँडमास्टर पी. इनियन विरुद्ध ड्रॉ खेळून मिळवला
  • तामिळनाडू राज्याचे 32 वे ग्रँडमास्टर

3) PM E-DRIVE ई-ट्रक योजना

  • भारतातील मालवाहतूक क्षेत्रात स्वच्छ, हरित आणि शाश्वत वाहतूक प्रोत्साहित करणे; 2070 पर्यंत नेट-झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी भारत सरकारणे सुरू केली
  • योजनेचे नाव: PM E-DRIVE (Electric Driving Revolution In Vehicles for Emissions Reduction)
  • योजना सुरू : 11 जुलै 2025
  • हस्ते – एच. डी. कुमारस्वामी (केंद्रीय जड उद्योग व पोलाद मंत्री)
  • भारत सरकारचे जड उद्योग मंत्रालया अंतर्गत योजना
  • भारताची पहिलीच इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र प्रोत्साहन योजना
  • सबसिडी – कमाल ₹9.6 लाख प्रतिवाहन
  • सहभागी प्रमुख कंपन्या – टाटा मोटर्स , अशोक लेलँड ,वोल्वो आयशर

4) अभिजित किशोर यांची COAI च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

  • COAI – Cellular Operators Association of India
  • 9 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली
  • 2025 – 2026 साठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
  • सध्या अभिजित किशोर हे व्होडाफोन मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत
  • COAI चे कार्य
    • COAI ही भारतातील टेलिकॉम, इंटरनेट, तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे.
    • या संघटनेचे उद्दिष्ट म्हणजे देशातील डिजिटल परिवर्तनाला गती देणे, धोरणात्मक सल्ला देणे आणि उद्योगाच्या हितासाठी काम करणे

5) स्वच्छ सर्वेक्षण, 2024 – 25

  • सुपर स्वच्छ लीग रँकिंग (शहरी स्वच्छता) = ही रँकिंग नव्याने सुरू करण्यात आलेली आहे
    1. इंदूर (सलग 8 वेळा)
    2. सुरत
    3. नवी मुंबई
    4. विजयवाडा
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
  • नवीन पिढीतील सर्वोच्च स्वच्छ शहरे
    1. अहमदाबाद
    2. भोपाळ
    3. लखनौ
  • गंगा शहर पुरस्कार
    • प्रयागराज – सर्वोत्कृष्ट गंगा शहर
    • यूपी सरकार, मेळा अधिकारी व मनपाला – महाकुंभमधील 66 कोटी लोकांच्या कचरा व्यवस्थापनाबद्दल विशेष सन्मान
  • सर्वोत्तम सफाईमित्र सुरक्षित शहरे
    1. विशाखापट्टणम
    2. जबलपूर
    3. गोरखपूर
  • छावणीतील कामगिरी
  • सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट – मजबूत स्वच्छता व्यवस्थापनासाठी
  • स्वच्छतेत नवकल्पना आणि पुढाकार
  • “Waste is Best” थीमचा पुरस्कार समारंभात उच्चार
  • 3R तत्त्वे (Reduce, Reuse, Recycle) वाढविण्यावर भर
  • स्वच्छ शहर भागीदारी उपक्रम
  • 78 सर्वोत्तम शहरे आपल्या राज्यातील कमी कामगिरी करणाऱ्या शहरांना दत्तक घेऊन मार्गदर्शन करतील.
  • डंपसाईट रिमेडिएशन प्रोग्राम
  • सुरुवात: 15 ऑगस्ट 2025
  • उद्दिष्ट:
    • वारसा कचरा सफाई
    • मौल्यवान जमीन मुक्त करणे
    • वैज्ञानिक कचरा प्रक्रिया वाढवणे

6) FIFA Club World Cup 2025

  • इव्हेंट: FIFA क्लब विश्वचषक 2025 (FIFA Club World Cup 2025)
  • ठिकाण: MetLife Stadium, न्यू जर्सी, अमेरिका
  • विजेता संघ: Chelsea FC (इंग्लंड)
  • पराभूत संघ: Paris Saint-Germain (PSG)
  • स्कोअर: Chelsea 3 – 0 PSG
  • विशेष बाबी:
    • प्रथमच 32 संघांचा क्लब वर्ल्ड कप
    • 2026 च्या FIFA वर्ल्ड कपपूर्वीचे परीक्षणात्मक आयोजन
    • Donald Trump यांनी ट्रॉफी वितरणादरम्यान उपस्थिती

7) राज्यपाल नियुक्त्या – जुलै 2025

  • गोवा – माजी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती
    • तेलुगू देसम पक्षाचे नेते
    • माजी केंद्रीय मंत्री
    • TDP चे लोकसभेत १६ खासदार
    • आंध्रसाठी विशेष आर्थिक तरतूद (केंद्रीय अर्थसंकल्पात)
  • हरियाणा – प्राध्यापक अशिम कुमार घोष यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • लडाख – जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री काविंदर गुप्ता यांच्याकडे लडाखच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी
  • या सर्व नियुक्त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाकडून जाहीर

8) दुर्मीळ ‘नेमोलिन मायोपेथी’चा राज्यात पहिला रुग्ण

  • पुण्यातील रुग्णालयात याची नोंद
  • ‘नेमोलिन मायोपेथी’ हा जन्मजात स्नायू विकार असून, यात शरीरातील स्नायू कमकुवत होतात, त्यांची वाढ खुंटते आणि मुलांना चालण्यात व पायावर उभे राहण्यात अडचणी येतात.

9) दीपक टिळक यांचे निधन

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू, ‘केसरी’ चे विश्वस्त – संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे निधन झाले.
  • ते 74 वर्षांचे होते.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्षही होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment