Current Affairs | चालू घडामोडी | 10 APR 2024
1) गांधीजींचे चंपारण्यला आगमन = 10 एप्रिल 1917
- तीन कठीया पद्धतीने निळ लागवडीच्या सक्तीविरुद्ध सत्याग्रह
2) 16 वा केंद्रीय वित्त आयोग
- कालावधी – 2026 ते 2031
- अध्यक्ष :- श्री. अरविंद पनगारिया
- सचिव :- रित्विक रंजन पांडेय
- 4 सदस्य
1. निरंजन राजाध्यक्ष मनोज पांडा
2. अजय नारायण झा
3. एनी जॉर्ज
4. सौम्य क्रांती घोष
3) जगातील सर्वात मोठा कॅमेरा अमेरिकन संशोधकांनी तयार केला आहे.
- अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने हा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.
- अवकाश निरीक्षणासाठी या कॅमेऱ्याची मदत होणार असल्याचे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेल्को इवेजिक यांनी सांगितले.
- जगातील हा सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा प्रामख्याने अवकाश संशोधनासाठी वापरला जाणार आहे.
- आकाशगंगा आणि सौरमाला यांचे निरीक्षण तसेच अंतराळातील अदृश्य गोष्टींची छायाचित्रे या कॅमेऱ्याच्या मदतीने घेता येणार आहेत.
4) भारतामधील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धा 30 एप्रिल ते 10 मे दरम्यान रांची येथे खेळवली जाणार
5) चोरीस गेलेला फोन शोधण्यासाठी ‘संचार साथी’ नावाचा प्लॅटफॉर्म
6) सर्बियाच्या जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत
- जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्वात वयस्कर पुरुष टेनिस फोटो म्हणून जोकोविच ची नोंद झालेली आहे
7) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा करण्याची गरज : केळकर
- GST चे मूळ आरेखनकार = डॉ. विजय केळकर
- डॉ. केळकर तीन प्रमुख सूचना करतात
- आताच्या पाच-सहा दर वैविध्यांच्या तुलनेत एकच एक सरसकट १२ टक्के इतकीच कर आकारणी केली जावी
- सध्या जीएसटीचे नियंत्रण बहुतांशी केंद्राकडून होते. यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात विसंवाद निर्माण होतो आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाची सत्ता ज्या राज्यांत आहे आणि नाही त्यांच्यात एक घर्षण होत राहते. त्यामुळे केंद्रनियंत्रित जीएसटी परिषद ही केंद्रापासून अ-संलग्न करून तीस अधिक स्वातंत्र्य दिले जावे
- या करांतून येणाऱ्या महसुलात स्थानिक स्वराज्य संस्थांनाही वाटा दिला जावा
- जीएसटी हा अप्रत्यक्ष कर. तो प्रत्यक्ष कराप्रमाणे उत्पन्नाशी निगडित नसतो. गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता सगळ्यांवरच अप्रत्यक्षपणे तो आकारला जातो
- अप्रत्यक्ष करात महत्त्वाच्या सुधारणांची गरज डॉ. केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2000 साली सुचवली .
- अंमल = 1 जानेवारी 2017
- टप्पे = 0,5,12,18,28 टक्के वर 10 टक्के अधिभार
- पेट्रोल, डिझेल, मद्य GST मधे नाहीत
8) निवडणुकीचा इतिहास 20
- आम आदमी पार्टी (आप)
- स्थापना = 26 नोव्हेंबर 2012 ; चिन्ह = झाडू
- 2012 मध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आदींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया ऑगस्ट करप्शन’ हे आंदोलन पेटले होते. यातूनच आम आदमी पक्षाची स्थापना झाली
- दिल्ली विधानसभेत 70 जागांपैकी 2013 साली 23, 2015 साली 67 तर 2020 साली 62 जागा मिळाल्या
- त्यानंतर पंजाब मध्ये सुद्धा 2022 मध्ये 117 पैकी 92 जागा मिळवून आप ने सरकार स्थापन केले
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel