Current Affairs | चालू घडामोडी | 11 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 11 APR 2024

1) महात्मा ज्योतिबा फुले जयंती = 11 एप्रिल 1827

  • शिक्षण = स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळांमध्ये
  • स्थापना कार्य
    • मुलींसाठी पहिली शाळा = 1848
    • अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा = 1852
    • सत्यशोधक समाज स्थापना =1873

2) राज्यात तीस वर्षांनी अपंगांचे सर्वेक्षण!

  • राज्यातील अपंगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याने अखेर ३० वर्षांनंतर अपंगांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्यातील अपंगांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख ६३ हजार होती. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये अपंगांचे प्रमाण २.६ टक्के होते.
  • जुन्या कायद्यामध्ये अपंगांचे सातच प्रकार होते. मात्र नवीन कायद्यानुसार अपंगांचे २१ प्रकार निश्चित करण्यात आले आहेत.
  • आशा सेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण जिल्ह्यातील अपंगांच्या सर्वेक्षणासाठी संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका क्षेत्रात संबंधित आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

3) ‘क्यूएस’ क्रमवारीत जेएनयू अव्वल

  • ब्रिटनमधील नामांकित क्वॅकेरली सायमंड्स (क्यूएस) क्रमवारीत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ या विषयाच्या जागतिक क्रमवारीत विसावे स्थान पटकावले आहे, तर हेच विद्यापीठ देशातील सर्व विद्यापीठांमध्ये अव्वल स्थानी आहे.
  • ‘आयआयएम-अहमदाबाद’ने ‘बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज’मध्ये जगातील सर्वोच्च २५ संस्थांमध्ये स्थान पटकावले आहे.
  • ‘क्यूएस’ या लंडनमधील उच्च शिक्षण मूल्यांकन संस्थेने जगातील उच्च शिक्षण संस्थांची विषय क्रमवारी जाहीर केली.
  • भारतातील ६९ उच्च शिक्षण संस्थांनी या संस्थेच्या क्रमवारीत स्थान मिळवले असून त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १९ टक्के वाढ झाली आहे.
  • शैक्षणिक प्रतिष्ठा, रोजगार प्रतिष्ठा, संशोधनांची प्रशंसा आदी निकषांवर उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करून ‘क्यूएस’ने क्रमवारी तयार केली.
  • युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स जगात अव्वल स्थानावर

4) पंतप्रधान आवास योजना

  • पंतप्रधान आवास योजना (नागरी)
    • पंतप्रधान आवास योजना (नागरी) सुरुवात = 25 जून 2015
    • पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (नागरी) २०२२ पर्यंत सर्व पात्र नागरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
    • नागरी भागातील अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि झोपडपट्टीवासीयांच्या घरांची कमतरता दूर करणे, हा योजनेचा उद्देश आहे.
    • गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
  • पंतप्रधान आवास योजना (नागरी)
    • पंतप्रधान आवास योजना (नागरी) सुरुवात = 1 एप्रिल 2016
    • ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर/ कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
    • योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, २०११ मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येत आहे.
    • ग्रामीण विकास मंत्रालय
  • पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना शहरी भागामध्ये २ लाख ५० हजार रुपये, तर ग्रामीण भागात १ लाख ४० हजार रुपये अनुदान दिले जाते.

5) देव कणांचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते पीटर हिग्ज यांचे निधन

  • त्यांनी अत्यंत मूलभूत स्वरूपाचे संशोधन करून विश्वाच्या निर्मितीसंबंधी काही अतर्क्य आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
  • १९६०च्या आरंभी त्यांनी ‘सिद्धान्तबद्ध’ केलेल्या, सुरुवातीस ‘हिग्ज बोसॉन’ आणि पुढे ‘गॉड पार्टिकल’ याच्या शोधात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
  • २०१२ मध्ये स्वित्झर्लंडला झालेल्या या प्रयोगामध्ये हिग्ज बोसॉनचे अस्तित्व दिसले आणि लगेच पुढील वर्षी पीटर हिग्ज यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
  • मूलकणांमध्ये वस्तुमान येते कोठून, या प्रश्नाची उकल या संशोधनामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. वस्तुमान नसेल, तर सर्वच मूलकण प्रकाशाच्या वेगाने विश्वाच्या विराट पसाऱ्यात उडून-हरवून जातील. परंतु हे कण संमीलित होतात आणि तारे, पशु-पक्षी, मानवाची निर्मिती होते. हिग्ज यांनी या मुद्द्याचा वेध घेतला.

6) गंजीफासह लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन

  • सावंतवाडी – येथील राजघराण्याच्या गंजिफा कलेसह सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.
  • त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

7) निवडणुकीचा इतिहास 21

  • मतदान यंत्र आणि बॅलेट पेपर
  • एका मतदान यंत्रावर 16 आणि चार यंत्रे एकमेकांना जोडल्यास 64 इतक्याच उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर मिळू शकतात

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment