Current Affairs | चालू घडामोडी | 16 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 16 APR 2024

1) पहिली रेल्वे सुरू = 16 एप्रिल 1853

  • मार्ग = बोरीबंदर (बॉम्बे) ते ठाणे
  • इंजिनचे नाव = साहिब, सिंध, सुलतान

2) नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!

  • स्वत:च्या नावाने किंवा पालकांपैकी एकाची मुलगी अथवा मुलगा म्हणून ओळखले जाण्याचा अधिकार हा प्रत्येकाच्या ओळखनिश्चितीसाठी मूलभूत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले
  • स्पेलिंगमधील थोड्या बदलांवरून दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
  • अशा प्रकरणांमध्ये पांडित्यपूर्ण नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारायला हवा असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

3) पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेसाठी जांभळ्या रंगाचा ट्रॅक

  • आतापर्यंत लाल मातीच्या रंगाने निर्माण केलेल्या सिंथेटिकच्या ट्रॅकवर या स्पर्धा पार पडत होत्या.
  • हा सिथेंटिक ट्रॅक इटलीतील एका कारखान्यात तयार करण्यात आला आहे

4) भारतातील पहिली संकरित खेळपट्टी धरमशालात

  • यामध्ये क्रिकेटची नैसर्गिक खेळपट्टी कायम ठेवून त्याच्या पृष्ठभागावर पॉलिमर फायबर बसवले जाते. यामुळे खेळपट्टीचे आयुष्य वाढते आणि एकसमान उसळीची हमी देते . खेळादरम्यान होणाऱ्या अनेक अडथळ्यावर अशा खेळपट्टी सहज मात करतात. त्यामुळे अशा खेळपट्ट्यांना लवचिक मानले जाते. खेळपट्टीवर नैसर्गिक गवतही ठेवण्यात येते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment