Current Affairs | चालू घडामोडी | 22 JULY 2025
1) २२ जुलै दिनविशेष
१.१) राष्ट्रीय ध्वज दिवस
- राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार (१९४७)
- संविधान सभेत निर्णय
- तिरंग्याचे रचनाकार = पिंगळी वेंकय्या
- लांबी :उंची = ३:२
- भारतीय ध्वज संहिता = २००२
१.२) १९०८: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
2) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा!
- देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावरून एक महत्त्वपूर्ण निर्णय!
प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. - त्यांनी ६ ऑगस्ट २०२२ रोजी १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
- त्या निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गरिट अल्वा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता –
- धनखड – ५२८ मते
- अल्वा – १८२ मते
- भारतीय संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार, राष्ट्रपतींना उद्देशून त्यांनी राजीनामा सादर केला आहे.

3) भारताला रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये 2 सुवर्ण 2 रौप्यपदके
- 57 वि आंतराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाड
- दिनांक – 5–14 जुलै 2025
- ठिकाण – दुबई, यूएई
- ऑलिम्पियाडमध्ये 90 देशांच्या मधून 354 विद्यार्थी सहभागी
- भारताने 6 वा क्रमांक पटकावला
- भारत 26 वेळा सहभागी झाले आहे
- मिळालेली पदके
- उज्वल केसरी (नवी दिल्ली) – रौप्यपदक
- देवेश पंकज भैया (जळगाव, महाराष्ट्र) – सुवर्ण पदक
- संदीप कुची (तेलंगणा) – सुवर्ण पदक
- देवदत्त प्रियदर्शनी(भुवनेश्वर, ओडिशा) – रौप्यपदक

4) बहुचर्चित ‘टेस्ला’ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात पदार्पण केले आहे
- मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात एक प्रशस्त शो-रूम सुरू करत ‘टेस्ला’ आयएनसी या कंपनीने जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाइल बाजारपेठेकडे म्हणजेच भारताकडे आपला मोर्चा वळवला.
- या शो-रूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
- ‘टेस्ला’ सुरुवातीला त्यांच्या मॉडेल वाय या गाडीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत उतरत असून या गाडीच्या अगदी सुरुवातीच्या व्हेरियंटची किंमत ६० लाख रुपये एवढी आहे.
- संपूर्णपणे स्वयंचलित असलेल्या ‘टेस्ला’च्या गाड्यांची चर्चा संपूर्ण जगभरात सुरु आहे

5) विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे भारताला यजमानपद
- भारताला आता दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.
- 2025 मध्ये ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धा भारतात रंगणार असून, स्पर्धेचे केंद्र योग्य वेळी जाहीर करण्यात येईल, असे जागतिक प्रशासकीय संस्थेकडून (फिडे) सांगण्यात आले.
- भारताने यापूर्वी २००२ मध्ये हैदराबाद येथे सर्व प्रथम विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी विश्वनाथन आनंद विजेता ठरला होता.
- मात्र, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप बदलण्यात आले. आता ही स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येते. त्यामुळे प्रत्येक फेरीतील पराभवानंतर खेळाडू स्पर्धेबाहेर होतो. विश्वचषक स्पर्धेचे भारताचा स्वरूप बदलल्यापासून एकही खेळाडू विजेता ठरलेला नाही.
- गतस्पर्धेत म्हणजेच 2024 मध्ये आर. प्रज्ञानंदने अंतिम फेरी गाठली होती, पण त्याला मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला होता.
- यंदाच्या स्पर्धेत २०६ खेळाडूंचा सहभाग असेल.

6) राज्यात ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’
- ३ ऑक्टोबर ‘अभिजात मराठी भाषा दिवस’
- अभिजात मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो ?
- हा दर्जा देताना मराठी भाषेची गेल्या सुमारे २५०० वर्षाची परपंरा गृहीत धरण्यात आली आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्यासाठी, जनमानसामध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, अभिजात मराठी भाषेसंदर्भातील संशोधन, जनजागृती जास्तीत जास्त व्हावी याकरिता प्रतिवर्षी ३ ऑक्टोबर दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

7) ‘कृषी समृद्धी’ योजना
- नवीन कृषी समृद्धी योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेच्या धर्तीवर राज्यात राबवली जाणार आहे.
- दरवर्षी ₹5000 कोटींचा निधी कृषी पायाभूत विकासासाठी खर्च होणार!
- “First Come, First Serve” तत्वावर निधी मंजुरी, एकाच जिल्ह्यात जास्त निधी खर्च नको याची दक्षता घेतली जाईल.
- योजनेअंतर्गत गुंतवणुकीची प्रमुख क्षेत्रे:
- जलव्यवस्थापन – शेततळे, ठिबक/तुषार सिंचन, जलसंधारण
- मृदा व कीड व्यवस्थापन – मृदा चाचणी, सेंद्रिय खत, अचूक अन्नद्रव्य
- बहुपीक पद्धती – कडधान्ये, भरडधान्य, तेलबिया, फलोत्पादन, औषधी वनस्पती
- साठवण व बाजारपेठ – गोदामे, शीतगृह, शीतसाखळी, सुकविण्याची जागा
- पूरक व्यवसाय – शेळीपालन, मत्स्यपालन, रेशीम, देशी गोवंश संवर्धन
- FPO व समिती बळकटीकरण – प्रशिक्षण व क्षमता विकास
- ‘पोकरा योजना’ ?
- ‘Project on Climate Resilient Agriculture’ (PoCRA) ही जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवली जात असून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी नावाने ओळखली जाते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel