Current Affairs | चालू घडामोडी | 25 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 25 JULY 2025

1) २५ जुलै दिनविशेष

१.१) १९९७ = कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा निर्णय

१.२) १८५६ = विधवा पुनर्विवाह कायदा अंमलात

१.३) १९९७: के. आर. नारायणन भारताचे १०वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले

१.४) २००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या

१.५) १८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म.

१.६) १९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.

१.७) १८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन.

2) राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक – थोडक्यात माहिती

  • केंद्रीय क्रीडामंत्री = मनसुख मांडवीय यांनी ही बिल लोकसभेत मांडले
  • बीसीसीआय आता कायदेशीर चौकटीत!
    • बीसीसीआयला ‘नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड’ची मान्यता घेणे बंधनकारक.
    • सरकारी निधी न घेताही देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागणार.
    • निवडणूक, खेळाडूंची निवड व वादांचे निवारण ‘राष्ट्रीय क्रीडा लवाद’ करणार.
    • लवादाचे निर्णय अंतिम – फक्त सर्वोच्च न्यायालयात आव्हान शक्य.
  • उद्देश: क्रीडा महासंघांवर नियंत्रण नव्हे, तर सुशासन सुनिश्चित करणे.
  • नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड (NSB):
  • अध्यक्ष : केंद्र नियुक्त
  • सदस्य :
  • कॅबिनेट/क्रीडा सचिव
  • साईचे महासंचालक
  • २ क्रीडा प्रशासक (पूर्व अध्यक्ष/सचिव/कोषाध्यक्ष)
  • १ प्रतिष्ठित खेळाडू (खेळरत्न/अर्जुन/द्रोणाचार्य पुरस्कार विजेता)
  • महत्वाचा बदल:
    • प्रशासकांची निवडणूक वयोमर्यादा ७० ऐवजी ७५ वर्षे केली जाईल.
    • ऐतिहासिक पाऊल – बीसीसीआयसह सर्व क्रीडा संस्था आता उत्तरदायी आणि पारदर्शक होणार!

3) ‘समुद्र प्रचेत’चे गोव्यात जलावतरण

  • गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) भारतीय तटरक्षक दलासाठी तयार केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रचेत’ याचे गोव्यातील वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये जलावतरण केले.
  • या जहाजाची लांबी ११४.५ मीटर असून रुंदी १६.५ मीटर आहे.
  • हे जहाज चौदा अधिकारी आणि ११५ खलाशी यांच्या साहाय्याने चालवले जाईल.
  • समुद्र प्रचेत नावाचे दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या मालिकेतील हे दुसरे जहाज आहे.
  • समुद्र प्रताप या पहिल्या जहाजाचे गेल्यावर्षी जलावतरण करण्यात आले होते.

4) ‘रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च 2025’ अहवाल

  • टॉप कंपन्या
  • प्रथम क्रमांक – टाटा समूह
  • दुसरे स्थान – गुगल इंडिया,
  • तिसरे – इन्फोसिस
  • पुढील क्रमवारी: सॅमसंग इंडिया, जेपी मॉर्गन चेस, आयबीएम, विप्रो, रिलायन्स, डेल, व दहाव्या स्थानी – स्टेट बँक ऑफ इंडिया (एकमेव बँक)
  • नोकरी निवडताना महत्त्वाचे घटक
    • काम-जीवन संतुलन
    • आकर्षक पगार व लाभ
    • समतेची संधी
  • टाटा समूह आघाडीवर का?
    • आर्थिक स्थिरता
    • करिअर प्रगतीची संधी
    • कंपनीची प्रतिष्ठा
  • अन्य लक्षवेधी बाबी
    • 38% लोकांनी मागील 6 महिन्यांत नोकरी बदलली. यामध्ये जेन झी लोकं जास्त आहेत.

5) नितीन गडकरी यांना ४३ वा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’

  • लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ४३ वा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर
  • पुरस्कार वितरण – १ ऑगस्ट २०२५ रोजी, लोकमान्य टिळकांच्या १०५व्या पुण्यतिथीला.
  • मागील पुरस्कारार्थी –
    • 2024: सुधा मूर्ती
    • 2023: नरेंद्र मोदी
    • 2022: टेस्सी थॉमस
  • पुरस्काराची स्थापना – 1983
  • लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, टिळक कुटुंबीय व समिती तर्फे दरवर्षी १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जातो
  • राष्ट्रीय पातळीवर समाजकार्य व राष्ट्रसेवा करणाऱ्या व्यक्तीचा गौरव

6) पुण्याच्या वैष्णवी आडकरने इतिहास रचला.

  • जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 🇮🇳
  • तिने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले
  • जर्मनी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिला सामना गमवावा लागला

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment