Current Affairs | चालू घडामोडी | 26 JULY 2025
1) २६ जुलै दिनविशेष
१.१) १९०२ = कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद
- शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गियांना आरक्षण
- ५०% नोकऱ्या राखीव ठेवण्याचा आदेश
१.२) १९९९ = कारगिल विजय दिवस
- ऑपरेशन विजय अंतर्गत विजय प्राप्त
१.३) २००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले
१.४) २०१६: सोलार इम्पल्स २ – हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
१.५) १८९२: दादाभाई नौरोजी – ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले
१.६) २६ जुलै: जागतिक मॅन्ग्रोव्ह दिवस (World Mangrove Day)
2) २६ जुलै: जागतिक मॅन्ग्रोव्ह दिवस (World Mangrove Day)
- मॅन्ग्रोव्ह म्हणजे काय?
- मॅन्ग्रोव्ह ही खाऱ्या पाण्यात, विशेषतः खाडी व समुद्रमुखाच्या परिसरात उगम पावणारी वनस्पती आहे. ही झाडे जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
- सुंदरबनचे महत्त्व:
- पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे जगप्रसिद्ध मॅन्ग्रोव्ह जंगल आहे.
- युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याचा समावेश आहे.
- येथे वाघ संवर्धन प्रकल्प (Tiger Conservation Project) कार्यरत आहे.
- आपत्ती व्यवस्थापनातील भूमिका:
- मॅन्ग्रोव्ह वनस्पती चक्रीवादळ व महाचक्रीवादळांपासून संरक्षण करतात.
- त्या प्राकृतिक धक्के शोषून किनारी भागांचे रक्षण करतात.
- रेडिओ लहरी व मदत कार्य:
- मॅन्ग्रोव्ह झाडे रेडिओ लहरी प्रसारित करण्यास मदत करतात.
- आपत्तीच्या वेळी रेडिओ लहरींच्या माध्यमातून मदत व बचावकार्य सुलभ होते.

3) Nvidia जगातील पहिली सार्वजनिक कंपनी बनली ज्याचे बाजार मूल्य $4 ट्रिलियन पार गेले
- 10 जुलै 2025 रोजी हा टप्पा गाठला
- अमेरिकन कंपनी आहे
- स्थापना – 1993 मध्ये जेन्सेन हुआंग (अध्यक्ष आणि सीईओ), ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रीम यांनी स्थापन केलेले
- Nvidia ही AI आणि GPU चिप्सची अग्रगण्य निर्माता कंपनी आहे
- फक्त 24 महिन्यांत, Nvidia ने $1 ट्रिलियन पासून $4 ट्रिलियन पर्यंत वाढ झाली
- किंमत $164.10 प्रति शेअर

4) आंध्र प्रदेशमध्ये भारताचा पहिला AI कॅंपस उभारला जाणार
- BITS पिलानी या शिक्षणसंस्थेने AI+ Campus उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
- हे Project Vistaar अंतर्गत होणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे
- ₹1000 कोटी खर्च अपेक्षित
- अमरावती, आंध्र प्रदेश येथे 35 एकरांवर हा AI+ Campus उभारण्यात येणार आहे.
- 2027 पर्यंत पहिला बॅच सुरू होण्याची शक्यता आहे.

5) IPS सोनाली मिश्रा यांना रेल्वे संरक्षण दलाचे पहिले महिला डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्त
- नाव: सोनाली मिश्रा (1993 बॅच, मध्य प्रदेश)
- पद: रेल्वे संरक्षण दलाचे पहिले महिला DG.
- कार्यकाळ: 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑक्टोबर 2026.
- माजी DG: मनोज यादव (निवृत्ती 31 जुलै 2025).
- विशेष महासंचालक (निवड आणि भरती), मध्यप्रदेश पोलिस
- त्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे
- भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफ फ्रंटियरचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहेत (पंजाब, 2021).
- RPF म्हणजे काय?
- Railway Protection Force (रेल्वे सुरक्षा बल)
- स्थापना वर्ष: 1957
- RPF हे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आहे.
- उद्दिष्ट: भारतीय रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांचे रक्षण करणे.रेल्वे परिसरात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे.
- RPF – केंद्र सरकारअंतर्गत कार्यरत
- GRP (Government Railway Police) –राज्य सरकारच्या अंतर्गत

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel