Current Affairs | चालू घडामोडी | 04 AUG 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 04 AUG 2025

1) ४ ऑगस्ट दिनविशेष

१.१) १८४५ = फिरोजशाह मेहता जयंती

  • राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष = कलकत्ता (१८९०)
  • वृत्तपत्र = बॉम्बे क्रोनिकल (1893) (इंग्लिश)
  • मुंबई महानगर प्रशासनाचे जनक

१.२) १९२३ = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना

१.३) २०२०: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)

2) अमेरिकेचा भारतावर शुल्कभार!

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली आहे
  • भारतासह 68 देशांचा आयातशुल्क यादीत समावेश
  • ७ ऑगस्टपासून अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर २५% वाढीव आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.(1 ऑगस्ट मुदत वाढवली)
  • रशियाशी व्यापार केल्याबद्दल दंड लावण्याचाही इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे.
  • सध्या भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले.
  • दंडाची रक्कम व शुल्कात फरक असणार का, हे अद्याप स्पष्ट नाही.
  • भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू:
  • औषधे, बायोलॉजिकल्स, टेलिकॉम उपकरणे, मौल्यवान खडे, पेट्रोलियम उत्पादने, वाहने, दागिने, सुती कपडे, लोखंड व पोलाद
  • भारताची अमेरिकेतून प्रमुख आयात:
  • कच्चे तेल, कोळसा, हिरे, विद्युत यंत्रे, सोने
  • भारत-अमेरिका व्यापार (2024-25): १८६ अब्ज डॉलर
  • वस्तू व्यापार
    • निर्यात: ८६.५ अब्ज डॉलर
    • आयात: ४५.३ अब्ज डॉलर
  • सेवा व्यापार
    • निर्यात: २८.७ अब्ज डॉलर
    • आयात: २५.५ अब्ज डॉलर

3) ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ 2025

  • चार स्तरांवर राबविणार: तालुका, जिल्हा, विभाग, राज्य
  • कालावधी:
    • पूर्वतयारी: 1 ऑगस्ट 2025 पासून
    • मुख्य अभियान: 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025
  • ग्रामपंचायत स्तर
  • राज्यस्तर
    • प्रथम – ₹5 कोटी
    • द्वितीय – ₹3 कोटी
    • तृतीय – ₹2 कोटी
  • विभागस्तर
    • प्रथम – ₹1 कोटी
    • द्वितीय – ₹80 लाख
    • तृतीय – ₹60 लाख
  • पंचायत समिती स्तर
  • राज्यस्तर
    • प्रथम – ₹2 कोटी
    • द्वितीय – ₹1.5 कोटी
    • तृतीय – ₹1.25 कोटी
  • विभागस्तर
    • प्रथम – ₹1 कोटी
    • द्वितीय – ₹75 लाख
    • तृतीय – ₹60 लाख
  • जिल्हा परिषद स्तर
    • प्रथम – ₹5 कोटी
    • द्वितीय – ₹3 कोटी
    • तृतीय – ₹2 कोटी
  • मूल्यमापनाचे घटक
    • सुशासन व पारदर्शकता
    • आर्थिक व प्रशासकीय क्षमता
    • स्वच्छता, जल व्यवस्थापन, हरितगाव
    • मनरेगा व इतर योजनांची यशस्वी सांगड
    • स्थानिक संस्थांचे सशक्तीकरण
    • उपजीविकेच्या संधी व सामाजिक समावेश
    • जनसहभाग व श्रमदानातून जनचळवळ
  • उद्दिष्ट:
    • ग्रामपंचायतींना स्पर्धात्मकतेच्या माध्यमातून प्रगतीकडे नेणे आणि सर्वसमावेशक व शाश्वत विकास साधणे.

    4) भारतातील पाहिले हिंदी MBBS

    • ठिकाण – जबलपूर (मध्यप्रदेश)
    • जागा –  50 MBBS जागा असतील
    • शिक्षण, परीक्षा आणि मेडिकल प्रशिक्षण पूर्णपणे हिंदी भाषेत असेल.
    • भविष्यात MD आणि MS सारखे पदव्युत्तर अभ्यासक्रमही हिंदीमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत
    • मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने 2022 मध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदीत सुरू केले.

    5) कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर

    • सातारा,सांगली,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,सोलापूर कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना फायदा होणा
    • दि.18 ऑगस्ट पासून प्रत्यक्ष कामकाज प्रारंभ होणार
    • मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे :
      • छ. संभाजीनगर
      • नागपूर
      • पणजी (गोवा)
      • कोल्हापूर (18 ऑगस्ट 2025 पासून)
    • मुंबई उच्च न्यायलय
      • स्थापना – 14 ऑगस्ट 1862  👩‍🎓
      • अधिकार क्षेत्र – महाराष्ट्र , गोवा ,दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
      • मुख्य न्यायाधीश – आलोक आराधे

    Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
    MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
    Telegram Channel || WhatsApp Channel

    TelegramWhatsAppCopy LinkShare

    Leave a Comment