Current Affairs | चालू घडामोडी | 11 AUG 2025
1) ११ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९६१ = १० वी घटना दुरुस्ती
- दादरा नगर हवेलीचा भारतीय संघराज्यात समावेश
- कलम २४०
१.२) १९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन
2) भारतीय टपाल खात्याचा रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय
- दिनांक – 1 सप्टेंबर 2025 पासून
- ही सेवा आता स्पीड पोस्ट सेवेत विलीन केली जाणार आहे.
- रजिस्टर्ड पोस्ट सेवा – 1854 मध्ये ब्रिटिश राजवटीत सुरू झाली होती

3) उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी
- दिनांक – 4 ऑगस्ट 2025 रोजी
- वेळ – दुपारी 1:30 वाजता
- ठिकाण – धराली (उत्तराखंड)
- धराली हे समुद्रसपाटी पासून 8600 फूट उंचीवर आहे
- धराली हे उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यातील एक गाव आहे, जे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे
- ढगफुटी मुळे “खीर गंगा नदीला” मुसळधार पावसामुळे पूर आला
- ढगफुटीमुळे जवळील नदी नाल्यांना महापूर आला आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला
- भरपूर जर वाहून गेल्याची घटना
- प्राचीन “कल्पकेदार” मंदिर देखील जमिनीखाली गेले
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री = पुष्कर सिंह धामी

4) “मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना ” – शालेय शिक्षण विभाग
- दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत वह्या पुस्तके विद्यार्थ्यांनी परत करावी
- शासन त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन पुस्तकांची वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे
- योजनेची टॅगलाईन -‘पुनर्वापरातून परिवर्तनाकडे
- मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेमुळे मुला-मुलींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होईल. कागदाची बचत होईल आणि पर्यावरण रक्षणाचा हेतूही साध्य होईल. तसेच सरकारवरील आर्थिक भारही कमी होईल.
- डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री

5) रशियाची INF करारातून माघार — 5 ऑगस्ट 2025
- 1987 चा ऐतिहासिक INF (Intermediate-Range Nuclear Forces) करार आता इतिहासजमा!
- पार्श्वभूमी
- स्वाक्षरी: 8 डिसेंबर 1987
- हस्ताक्षरकर्ते: रोनाल्ड रेगन (USA) मिखाइल गोर्बाचेव (USSR)
- लागू: 1 जून 1988
- उद्दिष्ट: 500–5,500 किमी रेंजच्या जमिनीवरून प्रक्षेपित होणारी आण्विक + पारंपरिक बॅलिस्टिक व क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट करणे
- निरीक्षण परवानगी: दोन्ही देशांना
- नाश: एकूण 2,692 क्षेपणास्त्रे
- रशियाची माघार (2025) — कारणे
- अमेरिकेने फिलीपिन्समध्ये Typhon Missile System तैनात केली (Intermediate-range क्षमता)
- ऑस्ट्रेलिया – Talisman Sabre युद्ध सराव → Intermediate-range क्षेपणास्त्रांचा समावेश
- नाटोला रशियाने “थेट धोका” मानले
- करार फक्त USA-रशिया पुरता; पण चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांच्याकडेही अशी क्षेपणास्त्रे होती, ज्यांना करार लागू नव्हता
- अमेरिकेची माघार (2019)
- तारीख: 2 ऑगस्ट 2019
- कारण: रशियाने SSC-8 नावाचे इंटरमीडिएट-रेंज क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करून कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप
- रशियाने हा आरोप नाकारला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel