Current Affairs | चालू घडामोडी | 01 FEB 2026
1) ०१ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) दिल्लीला राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राचा (NCT Delhi) दर्जा = १ फेब्रुवारी १९९२
– ६९ व्या घटनादुरुस्तीनुसार (१९९१) दर्जा प्रदान
– कलम २३९ AA चा समावेश
१.२) इंडियन कोस्ट गार्ड ची स्थापना = १ फेब्रुवारी १९७७
– शिफारस = नागचौधुरी समिती
१.३) १ फेब्रुवारी २०१४ = PFRDA अधिनियम (२०१३) लागू झाला
– Pension Fund Regulatory and Development Authority
१.४) १ फेब्रुवारी २०१९ = प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

2) भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे
⏩ छारी धांड – गुजरात
● ही बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित एक हंगामी खारट पाणथळ जागा आहे
⏩ पाटणा पक्षी अभयारण्य – उत्तरप्रदेश
● या गोड्या पाण्यातील दलदली, जंगले आणि गवताळ प्रदेश आहेत आणि ते कृषी भूदृश्यांनी वेढलेले आहे. एकत्रितपणे, हे वेगवेगळे भूदृश्य विविध प्रकारचे अधिवास निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैवविविधतेला आधार देतात.
● 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 Ramsar Sites होती
● आज ती संख्या 98 पर्यंत वाढली आहे— म्हणजे 276% पेक्षा जास्त वाढ!
⏩ रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
- भारतात एकूण 98 रामसर स्थळे झाली
- भारतात एकूण 13,84,140 हेक्टर क्षेत्र व्यापतात
- तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
- जागतिक पाणथळ दिन – 2 फेब्रुवारी
- रामसर कराराची तारीख – 2 फेब्रुवारी 1971
- रामसर मुख्यालय – ग्लैंड, स्वित्झर्लंड
- भारतातील पहिले रामसर स्थळ – चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)

3) ‘खेलो इंडिया विंटर गेम्स 2026’
- खेलो इंडिया विंटर गेम्स (KIWG) 2026 ही भारताची राष्ट्रीय शीतकालीन क्रीडा स्पर्धा आहे जी २० ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान लेह (लद्दाख) येथे आयोजित करण्यात आली
- २ टप्प्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित
- पहिला टप्पा
– या टप्प्यात आइस हॉकी आणि आइस स्केटिंग या दोन मुख्य शीतकालीन क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा झाली.
– फिगर स्केटिंग हा कार्यक्रम यावर्षी प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे
- पुढील टप्पा = गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर : लेहमध्ये चालणाऱ्या बर्फातील कार्यक्रमानंतर पुढील शीतकालीन कार्यक्रम गुलमर्ग येथे बर्फावर आधारित स्पर्धांसाठी आयोजित करण्यात येणार
- स्पर्धा आणि निकाल
– हरियाणा संघाने फिगर स्केटिंग मध्ये बऱ्याच सुवर्णपदकांसह उत्तम कामगिरी केली.
– आर्मी संघाने पुरुष आइस हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर चंडीगड संघाने सिल्ल्वर आणि ब्रॉन्ज सहित उत्कृष्ट कामगिरी केली.

4) सुनेत्रा पवार : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
- सुनेत्रा पवार : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
- त्यांच्याकडे
-राज्य उत्पादन शुल्क,
– क्रीडा व युवक कल्याण आणि
– अल्पसंख्याक विकास व औकाफ
या खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.
- त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
- उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार
➡️ राजकीय प्रवास
– जन्म = 18 ऑक्टोबर 1963
– कुटुंब = त्यांचे वडील बाजीराव पाटील आणि भाऊ पद्मसिंह पाटील हे दोघेही राजकारणात होते.
– शिक्षण : 1983 मध्ये वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली.
– लग्न : 1985 मध्ये अजित पवार यांच्यासोबत लग्न. 2 मुले, पार्थ आणि जय.
– सामाजिक कार्य: NGO एन्व्हायर्नमेंटल फोरम इंडियाची स्थापना केली. त्यांनी बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा म्हणून काम केले, जे हजारो महिलांना रोजगार देते. त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या म्हणून काम केले.
– राजकारणात प्रवेश: २०२४ ची लोकसभा निवडणूक बारामती येथून लढवली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव

5) अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार
- RPF अधिकारी चंदना सिन्हा यांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार
- भारतीय रेल्वेच्या RPF (रेल्वे संरक्षण दल) अधिकारी चंदना सिन्हा यांना त्यांच्या बाल तस्करीविरोधी कार्यासाठी अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार (भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सेवा पुरस्कार) ने सन्मानित करण्यात आले आहे
- त्यांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत १५० हून अधिक मुलांना वाचवले होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel